आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न विद्यार्थ्यांनी घेतले आपत्तीकाळात बचावाचे धडे

सिंधुदुर्गनगरी, दि.15 (जि.मा.का.) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 03 येथे विद्यार्थ्यांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व नागरी संरक्षण दल, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात शालेय विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन विषयक विविध प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली तसेच आपत्काळात बचावाच्या विविध पद्धतींबाबत देखील प्रात्यक्षिकामधून माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणाचा लाभ ११० विद्यार्थ्यांनी घेतला. यावेळी सहायक उपनियंत्रक, नागरी संरक्षण दल. बी. आर. ताम्हाणेकर, मुख्याध्यापिका श्रीम. वर्षा करंबेळकर,सहायक शिक्षक श्रीम. कोतवाल, श्रीम. अक्षया राणे,निवृत्त मुख्याध्यापक गणपत मालंडकर, सहायक लेखाधिकारी जयेश मालंडकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नीलेश चव्हाण, उपाध्यक्षा सायली राणे, तसेच ग्रामस्थ रवींद्र सावंत, चेतन गोवेकर, शितल गोवेकर,संपदा मालंडकर, अनिल अणावकर, किरण गोसावी, अभिषेक कोरडे उपस्थित होते. प्रशिक्षणाचे सूत्रसंचलन श्री. घाडीगांवकर यांनी केले. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'