सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट क पद भरती

सिंधुदुर्गनगरी, : सैनिक कल्याण विभागाच्या अधिपत्याखालील विविध जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील गट-क मधील सरळसेवेतील पदांची परीक्षा टि.सी.एस – आयओएन यांच्यामार्फत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली आहे. या भरतीकरीता सविस्तर जाहिरात सूचना, सैनिक कल्याण विभागाच्या www.mahasainaik.gov.in या संकेस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी व कार्यालयाचा दूरध्वनी क्र. 02362 228820 वर संपर्क करावा. तरी जिल्ह्यातील सर्व सुभेदार व समकक्ष पदावरुन निवृत्त झालेले माजी सैनिक (आर्मी, नेव्ही व एअर फोर्स), शहीद जवानाच्या वीरनारी (Battle Casualty) व दिवंगत सेवारत सैनिकाची पत्नी (Physical Casualty) यांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'