शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, : सन 2022-23 या वर्षाच्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी दि. 8 फेब्रुवारीर्पंयत सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन क्रीडा विभागामार्फत करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत राज्यातील क्रीडा विभागाच्या प्रतिष्ठेचा असलेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. क्रीडा क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू) शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करते. शासन निर्णयानुसार संचालनालयाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पुरस्कार या टॅबमध्ये (इंग्रजीकरीता Awards) शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे प्राथमिक छाननी केलेला गुणांकन तक्ता एकूण गुणांकनासह नमूद कालावधीमध्ये दि. 6 ते 8 फेब्रुवारी 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सूचना व हरकती सादर करावयाच्या आहेत. त्यानूसार विहिती नमून्यात सूचना व हरकती सादर करावे, असे क्रीडा विभागार्फत आवाहन करण्यात येत आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'