जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, दि.22 (जि.मा.का): जिल्ह्यातील काही भागात सेवारत सैनिक, माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता व त्यांच्या परिवाराला समाजातील इतर नागरीकांकडून मानसिक व शारीरीक त्रास देण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याअनुषंगाने गठित केलेल्या जिल्हास्तरीय समितीची बैठक दि. 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधीक्षक कार्यालय, कॉन्फरन्स हॉल, सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आलेले आहे. तरी ज्या माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा/ वीरपत्नी/ वीरमाता यांच्या खात्या संदर्भातील तक्रारी असतील, त्यांनी तक्रारी संदर्भातील कागदपत्रे घेऊन या बैठकीस उपस्थित राहवे, असे आवहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'