नमो महारोजगार मेळाव्यासाठी जिल्ह्यातील उद्योजक व उमेदवारांना नोंदणी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, : कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने ठाणे जिल्ह्यामध्ये आयलँड ग्राउंड, ढोकाळी, माजीवाडा, ठाणे, (पश्चिम) येथे दि. 24 व 25 फेब्रुवारी रोजी नमो महारोजगार कोंकण विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून जिल्ह्यातील उद्योजक व उमेदवारानी कौशल्य, रोजगार, उद्योजकता नाविन्यता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये राज्यातील विविध औद्योगिक आस्थापना व उद्योजक सहभागी होत असल्याने जिल्यातील नोकरीइच्छुक सर्व उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी नोंदणीकृत असलेल्या सर्व उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल अद्ययावत करावे. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता आपला बायोडाटा व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतीसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे. उद्योजकांनी आपल्याकडील उपलब्ध रिक्तपदे www.rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नमो महारोजगार मेळाव्यामध्ये अधिसूचित करावीत. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपली नोंदणी नसल्यास उद्योजक तसेच उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्ग येथे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संपर्क:- ०२३६२-२२८८३५, ९०११३९५३६८, ९४०३३५०६८९ ईमेल आयडी:- sindhudurgrojgar@gmail.com संपर्क करावा. नमो महारोजगार रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, सहायक आयुक्त ग. पां. चिमणकर यांनी केले आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'