'लिडकॉम आपल्या दारी' कार्यशाळेचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी, : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित हे कार्यरत असुन हे महामंडळ सुवर्ण जयंती वर्षात पदार्पण करत आहे. हेच औचित्य साधून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली दि. 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता जिल्हा कार्यालय, सिंधुदुर्ग येथे 'लिडकॉम आपल्या दारी' कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक प्रविण जाहीर यांनी दिली आहे. या महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) बांधवांना अवगत व्हावी, या उद्देशाने तसेच एम. सी. ई. डी. मार्फत देण्यात येणाऱ्या उद्योजकता विकास प्रशिक्षण संबंधी अर्जदार नोंदणी व प्रशिक्षणाची विस्तृत माहिती या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, होलार व मोची इ.) सर्व बांधवांनी या कार्यशाळेमध्ये उपस्थित राहून महामंडळाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपली सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रगती साध्य करुन आपला सामाजिक स्तर उंचवावा,असे प्रसिध्दीप्रत्रकाव्दारे कळविले आहे. 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'