जात पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दि 20 (जिमाका): अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग, ठाणे कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ठाणे, मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी "सन 2024 2025 या शैक्षणिक वर्षासाठी वैद्यकिय शिक्षण, अभियांत्रिकी पदवीका, डिप्लोमा, पदवीत्तर अभ्यासक्रम व इतर व्यवसायिक अभ्यासक्रम इ.करिता प्रवेश घ्यावयाचे आहेत, अशा इच्छुक अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे जात पडताळणी प्रस्ताव पडताळणी साठी https://etribevalidity.mahaonline.gov.in या संकेत स्थळावर दि. 31 मार्च 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन कोकण विभाग अनुसूचित जमती प्रमाणपत्र तपासणी समितीचे सहआयुक्त तथा उपध्यक्ष दिनकर पावरा यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अनुसूचित जमाती राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित उमेदवारास अर्ज भरताना जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत जोडणे अत्यावश्यक आहे. प्रस्तावाची प्रत प्रत्यक्ष समिती कार्यालयास जमा करावी. अर्जदार यांनी मुदतीत जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज सादर न केल्यास जात वैधता प्रमाणपत्रा अभावी होणाऱ्या विलंबास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही याची नोंद घेण्यात यावी. जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत काही अडचणी असल्यास ठाणे समिती कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक 022-25302930 वर संपर्क करावा. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'