राष्ट्रीय युवा संसद महोत्सव
सिंधुदुर्गनगरी, दि.13 (जि.मा.का.) : नेहरू युवा केंद्र संगठन (भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय युवा संसद महोत्सव - 2024 आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा युवा अधिकारी मोहित कुमार सैनी यांनी दिली आहे.
या स्पर्धकाला हिंदी, इंग्रजी किंवा मराठी भाषेमध्ये विषय मांडावा लागणार आहे. स्पर्धेचा वेळ जास्तीत जास्त 4 मिनिटे असेल. स्पर्धकांची वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष (1 फेब्रुवारी 2024) पर्यंत असावे.)
कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे -जिल्हास्तरीय स्पर्धा, राज्यस्तरीय स्पर्धा, ऑनलाइन पध्दतीने होणार असून तर राष्ट्रीय स्तरावर ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील विजेत्या स्पर्धकांना देण्यात येणारी बक्षिसे, प्रथम- दोन लाख रुपये, द्वितीय 1.5 लाख रुपये व तृतीय एक लाख रूपये आणि उत्तेजनार्थ दोन स्पर्धकांना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.
जिल्हास्तरीय प्रथम व द्वितीय क्रमांक स्पर्धक हा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे व राज्यस्तरीय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक स्पर्धकास राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमासाठी संसदेत आमंत्रित केले जाईल.
यास्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकानी mybharat.gov.in या पोर्टलवर 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत नोंदणी करावी. पोर्टल नोंदणी करण्यासाठी अडचणी येत असल्यास दिनांक 16 फेब्रुवारी 2024 पर्यंत संध्याकाळी 5 च्या आधी anyksindhudurg@gmail.com वर नोंदणी फॉर्म सबमिट करावा. अधिक माहितीसाठी नेहरू युवा केंद्र,प्रशासकीय इमारत, ए-ब्लॉक, तळमजला, ओरोस, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग, ४१६८१२ दूरध्वनी क्र. ०२३६२-२९५०१२. येथे संपर्क साधावा.
०००००
Comments
Post a Comment