जिल्ह्यात 5 मार्चपर्यंत अनाथ पंधरवडा

सिंधुदुर्ग दि 27 (जिमाका): जिल्ह्यात अनाथ बालकांसाठी दि. 23 फेब्रुवारी ते 5 मार्च 2024 या कालावधीमध्ये अनाथ पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व तालुका तहसीलदार कार्यालयामध्ये तसेच जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे समर्पित कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी दिली आहे. अनाथ मुलांना राज्य शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा याकरीता महिला व बालविकास विभागामार्फत अ, ब व क प्रवर्गातून अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहे. यासाठी अर्जदार यांच्या आई व वडील यांचा मृत्यु दाखला, अर्जदार यांचा जन्म दाखला, ग्रामसेवक यांचा बालकाचे अनाथ प्रमाणपत्र सिध्द करण्यासाठीचा दाखला, पोलीस पाटील यांचा रहिवाशी दाखला, आधारकार्ड, रेशनिंगकार्ड, जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्वाचा दाखला, मतदानकार्ड, महाराष्ट्र राज्य वय व अधिवास दाखला इ. कागदपत्रे सदर अनाथ बालकांना सदर पंधरवड्यात मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून तात्काळ कार्यवाही होणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसिलदार कार्यालय येथे संपर्क साधावा. अनाथ प्रमाणपत्र माहितीसाठी (परीविक्षा अधिकारी) महेश सावंत मो. 9423303064, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी विश्वनाथ कांबळी मो. 9404444922, संरक्षण अधिकारी बिगर संस्थात्मक काळजी, दिपिका सावंत 9730247898 या क्रमांवर संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'