बंदुक परवान्याच्या नुतणीकरणाची प्रक्रीया

सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) :- जिल्ह्यातील बंदुक परवानाधारकांना परवान्यांची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी संपत आहे. त्यांनी परवान्याचे नूतनीकरणासाठी सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील असलेल्या उपचिटणीस शाखेत सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत खालील आवश्यक माहितीसह विहीत नमुन्यातील अर्ज दाखल करण्याचे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी नितीन राऊत यांनी केले आहे. 1. शस्र परवाना नुतनीकरण करीता आवश्यक असलेला Form A-3 परिपूर्ण माहितीसह सादर करावा (अर्जावर फोटो लावणे आवश्यक आहे). 2. शस्र वापरण्यास शारीरीक दृष्ट्या सक्षम असल्याबाबतचे Form S-3 नमुन्यात जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांचे प्रमाणपत्र.3. शस्र परवाना नूतनीकरण करीता आवश्यक असलेला Form - S-4 संबंधित पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे यांच्याकडून सही शिक्यानिशी सादर करावा.4. शस्र पडताळणी केलेबाबतचे संबंधित पोलीस ठाणे निरीक्षक यांच्याकडील शस्र पडताळणी प्रमाणपत्र.5.सरपंच/पोलीस पाटील/नगराध्यक्ष / यांच्याकडील रहिवाशी व वर्तवणुकीचा दाखला किंवा आधारकार्ड.6. मुळ शस्र परवाना अर्जासोबत जोडावा.7. परवाना नुतनीकरण 5 वर्षाकरीता फी रु. 2500/- (दोन हजार पाचशे रुपये मात्र) शासन जमा करणे आवश्यक आहे. परवान्यास नुतनीकरणास विलंब झाल्यास प्रतिवर्षी प्रमाणे 500/- दंड आकारण्यात येईल. तसेच शस्र परवाना नुतनीकरण करण्यास विलंब झाल्यास सबळ पुरावा अर्जासह सादर करावा.8.शस्त्र परवाना नूतनीकरण करीता आवश्यक असलेला Form A-3 तहसिलदार कार्यालय येथील सेंतू सुविधा केंद्रात उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.9. अर्ज पोस्टाद्वारे किंवा तालुक्याचे ठिकाणी स्विकारले जाणार नाहीत. तसेच नूतनीकरण झालेले शस्र परवाने पोस्टाने पाठविले जाणार नाहीत. एकाच दिवशी गर्दी होऊ नये म्हणून तालुकानिहाय कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे. नेमलेल्या तारखांनाच त्या - त्या तालुक्याच्या परवानाधारकांनी शस्र परवान्यासह उपस्थित रहावे. तरी संबंधित परवानाधारकांनी याची नोंद घेऊन नेमून दिलेल्या दिवशी व वेळी (सार्वजनिक सुट्या वगळून) कार्यवाही करावी. तालुका नेमून दिलेले दिवस देवगड दि. 2,3,4 डिसेंबर 2024 सावंतवाडी दि. 5,6,9 डिसेंबर 2024 दोडामार्ग दि. 10,11 डिसेंबर 2024 मालवण दि. 12,13,16 डिसेंबर 2024 कुडाळ दि. 17,18,19 डिसेंबर 2024 कणकवली दि. 20,23,24 डिसेंबर 2024 वेंगुर्ला दि. 26, 27 डिसेंबर 2024 वैभववाडी दि. 30, 31 डिसेंबर 2024 00000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'