जागतिक मानवी हक्क दिन संपन्न

सिंधुदुर्गनगरी दि. 11 (जिमाका) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सिंधुदुर्गनगरी येथे जागतिक मानवी हक्क दिन संपन्न झाला. यावेळी समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे, श्री. गायकवाड यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. बोर्डवे आश्रमशाळेचे मुख्यध्यापक आनंद कर्पे, यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.जिल्हा सामान्य प्रशासन विभागचे श्री. गायकवाड यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी यांना मानवी हक्क दिनाबात माहिती दिली. समातादूत (प्रमूख वक्ता) सगुण जाधव यांनी मानवी अधिकार व संविधान याबाबत मार्गदर्शन केले. समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे, यांनी मानवी हक्क दिनाबाबत माहिती दिली. त्यानंतर जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयाचे अधिक्षक श्रीम. शलाका तांबे, यांनी मानवी हक्क दिनाबाबत थोडक्यात माहिती दिली. उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमास सहाय्यक आयुकत, समाज कल्याण कार्यालय, विविध महामंडळे व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती या कार्यालयातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचारी, समतादूत व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'