अंतर्गत तक्रार निवारण समितीची तात्काळ स्थापणा करावी

सिंधुदुर्गनगरी दिनांक 20 (जिमाका) :- महिलांच्या सुरक्षेतीसाठी कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 पारित करण्यात आलेला आहे. यामध्ये कामाच्या ठिाकणी अंतर्गत तक्रार निवारण समिती (ICC) गठीत करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सर्व प्रकारच्य औद्योगिक, व्यापारी आस्थापना, खासगी आस्थापना जिथे 10 किंवा 10 पेक्षा जास्त कामगार आहेत त्याठिकाणी या समितीची स्थापना तात्काळ करण्यात यावी असे आवाहन करण्यात येत आहे. राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य, यांच्या "महिला आयोग आपल्या दारी " हा कार्यक्रम व जनसुनावणीमध्ये आयोगाने अंतर्गत तक्रार निवारणी समितीच्या स्थापनेवर भर दिला असून आयोगाव्दारे समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहे. स्थापन केलेल्या समितीचे नाव व त्यांच्या कार्यकाळ इ. माहिती आपल्या आस्थापनेच्या नोटीस बोर्डावर प्रसिध्द करुन ती सर्व कर्मचारी यांच्या निदर्शनास आणावे. व त्याची प्रत सरकारी कामगार अधिकारी, सिंधुदुर्ग कार्यालयाच्य Sindhudurgglo@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवण्यात यावी, असे आवाहन सकारी कामगार अधिकारी राजेश जाधव यांनी केलेले आहे. ०००० आरटीओ कार्यालयांतर्गत शिबीरांचे आयोजन सिंधुदुर्गनगरी दिनांक 20 (जिमाका) :- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे घेण्यात येत असलेल्या जिल्ह्यातील तालुकास्तरीय शिबीर माहे जानेवारी ते जून 2025 या कालावधीकरीता वेळापत्रक खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी दिली आहे. माहे देवगड कणकवली मालवण वेंगुर्ला सावंतवाडी दोडामार्ग जानेवारी 08 09,21 15 16 22,29 23 फेब्रुवारी 05 06,18 11 12 20,27 25 मार्च 05 06,25 12 13 19,26 20 एप्रिल 02 03,23 08 09 16,24 17 मे 07 08,20 14 15 21, 28 22 जून 04 05,25 11 12 18,26 19 या शिबीर कार्यालयाचे कर्तव्यार्थ कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी करतील. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'