वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध योजनेंचा लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दि. १७ (जिमाका) :- वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत 25 टक्के बीज भांडवल कर्ज योजना, 1 लाख थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना अशा विविध योजनेंचा विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग (SBC) जमातीतील गरजू लोकांनी या याजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवथ्यापक पोपट गिते यांनी केले आहे.
राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील सामाजातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने या महामंडळाची स्थापना केली आहे. समाजातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यावसायिक व स्वयंरोजगाराकरिता रु.१.०० लक्ष ची थेट कर्ज योजना (नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज नाही) व २५ टक्के बीज भांडवल योजना, तसेच ऑनलाईन योजनांमध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु.१०.०० लक्ष पर्यंत), गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. १०.०० लक्ष ते ५०.०० लक्ष पर्यंत) या योजनांचा समावेश आहे.
थेट कर्ज योजना (भौतिक उद्दीष्ट-५०) व २५ टक्के बीज भांडवल योजना (भौतिक उद्दीष्ट- १) या योजनांचे अर्ज जिल्हा कार्यालयात सशुल्क उपलब्ध आहेत.
रु.१.०० लक्ष थेट कर्ज योजना :- लाभार्थीना सदर कर्ज महामंडळातर्फे दिले जाते कर्ज परत फेडीचा कालावधी ४ वर्ष आहे अर्जदाराचे वयाची मर्यादा १८ ते ५५ वर्षे आहे कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज आकारण्यात येणार नाही. मासिक हप्ता रु २०८५/-.
२५ टक्के बीज भांडवल योजना :- कर्जाची उच्चतम मर्यादा रु.५.०० लक्ष पर्यंत, कर्ज परत फेडीचा कालावधी ५ वर्षे आहे. अर्जदाराचे वयाची मर्यादा १८ ते ५० वर्षे आहे. बँकमार्फत लाभार्थीना ७५ टक्के कर्ज उपलब्ध केले जाते. यामध्ये महामंडळाचा सहभाग २५ टक्के बँकेचा सहभाग ७५ टक्के महामंडळाच्या कर्जरक्कमेवर व्याजाचा दर- ४ टक्के असतो.
या योजनांसाठी लागणारी कागदपत्रे :- पासपोर्ट साईज २ फोटो. तहसिलदार/नायब तहसिलदार यांनी दिलला उत्पन्नाचा मुळ दाखला (ग्रामीण व शहरी भागासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. १.०० लक्ष.), सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र (विजाभज व वि.म.प्र.) दरपत्रक (कोटेशन) प्रकल्प अहवाल, आधारकार्ड, पॅनकार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र व शिधापत्रिकेची झेरॉक्स, स्थानिक स्वराज्य संस्थेचे (ग्रामपंचायत/ नगरपालिका) व्यवसाय करण्याबाबतचे ना हरकत प्रमाणपत्र, डोमिसाईल, रहिवासी दाखला, आधारकार्ड लिंक केलेल्या पासबुकची झेरॉक्स, वयाच्या पुराव्यासाठी शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र/जन्मतारखेचा दाखला, भाडेकरार किवा संबंधित जागामालकाचे संमती पत्र व व्यवसायाच्या जागेचा अॅसेसमेंट उतारा कागदपत्रे लागतात.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (भांतिक उद्दीष्ट- १५०) व गट कर्ज व्याज परतावा योजना (भौतिक उद्दीष्ट- ०१) या योजनांकरिता महामंडळाच्या www.vjnt.org या संकेत स्थळाला भेट देवून ऑनलाइन अर्ज दाखल करता येईल.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना :- (रु.१०.०० लक्ष पर्यंत) ही योजना संपूर्णपणे संगणीकृत आहे. या योजनमध्ये बँकेने रु. १०.०० लाखापर्यंतच्या मर्यादेत कार्ज मजूर केलेल्या अर्जदाराने कर्जाचे हप्ते नियमित भरल्यानंतर व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादत) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येते. योजनेचा कालावधी ५ वर्ष असेल. या योजनेंसाठी अर्जदाराचे १८ ते ५० असावे. अर्जदाराचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.८.०० लक्ष पर्यंत (सक्षम प्राधिकारणाने वेळोवेळी दिलेल्या असणे अनिवार्य), महामंडळाच्या www.vjnt.org (व्याज परतावा योजना पर्याय) या वेबपोर्टलद्वारे ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतूपत्र (Letter of Intent) दिले जाईल, अर्जदारास या आधारे बँकेकडून कर्ज मंजुर करुन घ्यावे लागेल.
गट कर्ज व्याज परतावा योजना (रु. १०.०० लक्ष ते ५०.०० लक्ष पर्यंत):- विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहीत केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादतीतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनियम २०१३ अंतर्गत), LLP,FPO अशा शासन प्रमाणिकरण प्राप्त संस्थांना बँकेमार्फत स्वयंरोजगार उद्योग उभारण्यासाकरीता ने कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बँक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडून अदा केला जाईल.
कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. ८.०० लक्ष पर्यंत असलेल्या उमेदवारांच्या गटास बँकेकडून रु. १०.०० लक्ष ते रु. ५०.०० लाखापर्यंत मंजुर उद्योग उभारणीकरीता कर्ज उपलब्ध केले जाईल. गटातील सदस्यांचे वय १८ ते ४५ पर्यंत असावे. गटातील सर्व सदस्यांचा सिबिल क्रेडिट स्कोअर किमान ५०० इतका असावा. परतफेडीचा कालावधी - मंजूर कर्जावर ५ वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जो कमी असेल तो. कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास. हप्ता भरल्यानंतर (१२ टक्के मर्यादेत) त्यातील व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. महामंडळाच्या www.vjnt.org (व्याज परतावा योजना पर्याय) या वेबपोर्टलद्वारे गटाचा ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतुपत्र (Letter of Intent) दिले जाईल. गटास या आधारे बँकेकडून कर्ज मंजूर करुन घ्यावे लागेल.
अधिक माहितीकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादीत) जिल्हा कार्यालय-सिंधुदुर्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अ विंग, १ ला मजला, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग ईमेल- dmsnyjntsindhu@gmail.com दूरध्वनी क्र: ०२३६२-२२८१५६ येथे संर्पक साधावा.
०००००
Comments
Post a Comment