ाजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १ डिसेंबर रोजी

र सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2024 रविवार 1 डिसेंबर 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ आणि कुडाळ हायस्कूल, कुडाळ ज्यनियर कॉलेज या दोन उपकेंद्रावर घेण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितिन राऊत यांनी दिली आहे. या परीक्षेची वेळ सकाळी 10 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते सायंकाळी 5 या दोन सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी एकूण 583 उमेदवार परीक्षेस बसणार आहेत. परीक्षेची बैठक व्यवस्था पुढीलप्रमाणे उपकेंद्रावर करण्यात आलेली आहे. संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ (KD001001 ते KD 001192), कुडाळ हायस्कूल, कुडाळ ज्यनियर कॉलेज (KD 002001 ते KD002391). या परीक्षेच्या आयोजनाबाबत उमेदवारांना महत्वाच्या सूचना:- उमेदवारांनी परीक्षा सुरु होण्याच्या वेळेपूर्वी किमान दिड तास अगोदर उपस्थित रहावे. येताना सुधारीत प्रवेशप्रमाणपत्र, ओळखीसाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, निवडणूक आयोग ओळखपत्र, स्मार्ट कार्ड व ड्रायव्हींग लायन्सन पैकी एक व त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत प्रत्येक पेपरच्या वेळी स्वतंत्र सादर करावी. आयोगामार्फत आयोजित परीक्षामध्ये कॉपीचा/ गैरप्रकाराचा प्रयत्न करणाऱ्या घटनांची आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात येईल. अशा प्रकरणी आयोगाकडून संबंधितांवर फौजदारी व प्रशासकीय अशा दोन्ही स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. परीक्षांकरीता आयोगाने कडक उपाययोजना केलेल्या आहेत. परीक्षा उपकेंद्रांवर उमेदवारांची आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेल्या सेवा पुरवठादार संस्थेच्या कर्मचाऱ्याकडून तपासणी (Frisking) करण्यात येणार आहे. आयोगाकडून परीक्षेच्या पर्यवेक्षणासाठी विशेष निरीक्षक, भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी स्वत: पर्यवेक्षणावर लक्ष ठेवणार आहेत. ००००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'