पशुसंवर्धन विभागामार्फत 21 व्या पशुगणनेस सुरुवात प्रगणकांना पशुपालकांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी अनिल पाटील

सिंधुदुर्गनगरी 25 (जि.मा.का) :- पशुसंवर्धन विभागाकडून दर 5 वर्षींनी पशुगणना केली जाते. या अंतर्गत 21 व्या पंचवार्षिक पशुगणनेस 25 नोव्हेंबर 2024 पासून प्रारंभ होत असून 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत ही मोहिम राबविण्यात येणार आहे. पशुगणना मोहिमेत गाय, म्हैस, शेळी-मेंढी, अश्व, वराह, कुक्कुटपक्षी आदी प्रजातीच्या जाती, लिंग व वयनिहाय गणना करण्यात येणार आहे. पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी केले आहे. ग्रामीण भागासाठी 87 आणि शहरी भागासाठी 9 असे एकूण 96 पशुगणनेसाठी प्रगणक तर ग्रामीण भागासाठी 16 आणि शहरी भागासाठी 1 असे एकूण 17 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. प्रगणकांद्यारे गोळा होणारी माहिती ही शासकीय योजनांसाठी महत्वाची ठरणार असल्याने पशुपालकांनी जनावराची अचुक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस.सी. बलोलीकर व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एस.बी. ठाकूर यांनी केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'