एक लाख थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 23 (जिमाका) :- वसंतराव नाईक मुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळ अंतर्गत कै.पैलवान मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ उपकंपनी तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मुख्य कंपनी सिंधुदुर्ग या कार्यालयामार्फत 1 लाख थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. तरी विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक पोपट गिते यांनी केले आहे. सन.2024-2025 या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून 1 लाख थेट कर्ज योजनेमध्ये संपूर्ण कर्ज महामंडळाकडून दिले जाणार आहे. लाभार्थीने रू.2,085/- चा नियमित 48 समान मासिक हप्त्यामध्ये परतफेड करणाऱ्या लाभार्थींना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकित हप्त्यावर द.सा.द.शे. 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल. तशेच 25 टक्के बीजभांडवल कर्ज योजना, ऑनलाईन योजनामध्ये वैयक्तिक व्याज परतावा योजना (रु.10 लाखापर्यंत) गट कर्ज व्याज परतावा योजना (रु.10 लक्ष ते 50 लाखापर्यंत या योजनेचा समवेश आहे अशे पत्रकात म्हटले आहे.) अधिक माहितीसाठी महामंडळाचे सिंधुदुर्ग जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक मुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्‍याय भवन,अ विंग,1ला मजला,सिंधुदुर्गनगरी ता.कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग दूरध्‍वनी क्र :02362-228156 येथे संपर्क करावा. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'