''घर घर संविधान" कार्यक्रम संपन्न

सिंधुदुर्गनगरी 27 (जि.मा.का) भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव सन 2024-25 पासून ''घर घर संविधान" कार्यक्रम साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात भारतीय संविधान या विषयावर व्याख्यान घेण्यात आले असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) किशोर काळे यांनी दिली आहे. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, सर्व खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. डॉ. सोमनाथ कदम, (व्याख्याते) इतिहास विभाग प्रमुख कणकवली कॉलेज कणकवली उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन, संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. त्याचबरोबर सर्व विभागप्रमुख यांनी शासन निर्णयामध्ये शासनाने दिलेल्या सूचनेप्रमाणे वर्षभरामध्ये घ्यावयाच्या कार्यक्रमाचा आराखडा तयार करुन सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्याच्या सूचना दिल्या. प्रा.डॉ. सोमनाथ कदम यांनी संविधान आज घराघरात पोहचले पाहिजे ही जबाबदारी सर्व नागरीकाची असून यामध्ये शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची भूमीका महत्वाची आहे. संविधान प्रत्येकानी आपल्या घरात ठेवले पाहिजे. संविधानाने आपल्याने जसे मुलभूत हक्क दिले आहेत तसेच मुलभूत कर्तव्य दिले आहेत. प्रत्येक नागरीकाने हक्क आणि कर्त्यव्याप्रती सजग व जागृत राहीले पाहिजे. प्रा.डॉ. सोमनाथ कदम यांनी संविधान निर्मीतीचे टप्पे सांगितले संविधान निर्मातीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान महत्वाचे असल्याचे सांगुन इतर देशापेक्षा आपले संविधान लिखीत आणि मोठे असल्याचे सांगितले. संविधानामुळे सर्वाना मतदानाचा अधिकार, संपती धारण करण्याचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. त्याचबरोबर नागरीकांना समता, बंधुता, न्याय, प्रतीष्ठा मिळाल्याचे सांगीतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन (पाणी व स्वच्छता) उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर व आभार प्रदर्शन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुधाकर ठाकूर, यांनी केले. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'