संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन
सिंधुदुर्गनगरी 26 (जि.मा.का) :- भारताच्या संविधान दिनानिमित्ताने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल व विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून महत्त्व सांगितले.
भारतीय राज्यघटनेचा स्वीकार 26 नोव्हेंबर 1949 रोजी करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून दरवर्षी 26 नोव्हेंबर हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रवी पाटील, उपजिल्हाधिकारी बालाजी शेवाळे, नितीन राऊत ,आरती देसाई यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००००
Comments
Post a Comment