जिल्ह्यात “स्पर्श” व “कुसुम” कुष्ठरोग जनजागृती अभियान
सिंधुदुर्गनगरी दिनांक 20 (जिमाका) :- जिल्ह्यात २६ जानेवारी २०२६ रोजी ग्रामसभेमध्ये कुष्ठरोगाविषयी संदेश जनसामान्यांपर्यत पोहचविण्यात येणार आहे. महात्मा गांधी पुण्यतिथीचे औचित्य साधून दिनांक ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत “स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. याच कालावधीत राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार “कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (कुसुम)” मोहीम देखील राबविली जाणार आहे, त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठक पार पडली, असल्याची माहिती सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग डॉ. एस.व्ही. गुजलवार यांनी दिली आहे.
“स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान २०२५-२६ :-
कुष्ठरोगाबाबत समाजात पसरलेला गैरसमज अंधश्रद्धा व भीती दूर करण्याकरिता“स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान घेण्यात येणार आहे. अभियानात दि. 26 जानेवारीच्या ग्राम सभेत कुष्ठरोगाबाबत जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या देशाचे वाचन तसेच सरपंचाचे भाषण व प्रतिज्ञा यांचे वाचन करण्यात येणार आहे.
अभियानांतर्गजिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपातळीवर शिक्षक, विद्यार्थीचीप्रभात फेरी काढण्यात येणार आहे व यामधून समाजात पसरलेल्या कुष्ठरोगाबाबत गैरसमज, अंधश्रद्धा व भीती दूर होईल, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर व गाव स्तरावर प्रभात फेरी, महिला मेळावे , गटसभा , शालेय मुलांच्या स्पर्धा इत्यादी घेण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायती, सुमारे १५६८ शाळांमध्ये १६१३ आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत व वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबविली जाणार आहे.
घोषवाक्य : “भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया” हे या वर्षीचे घोषवाक्य आहे.
“कुसुम” (कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र) अभियान २०२५-२६ :-
ज्या व्यक्तींची नियमित सर्वेक्षणामध्ये अथवा एल.सी.डी.सी. मोहिमे दरम्यान तपासणी होण्याची 100 टक्के खात्री नाही आशा उपेक्षित गटांवर विशेष लक्ष केंद्रित करणे आवश्यक असते. अतिजोखमिच्या किंवा संवेदनशील भागातील विटभट्टी कामगार, बांधकाम मजूर, स्थलांतरित मजूर, निवासी, आश्रमशाळा, विश्रामगृह, खाण कामगार, कारागृहातील कैदी, औद्योगिक कामगार आशा लोकांचे सर्वेक्षण दि. ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत “कुसुम” मोहिमे अंतर्गत केले जाणार आहे.
जिल्ह्यामध्ये एकूण 608 अतिसंवेदनशील भागांमधील सुमारे 12500 नागरिकांची तपासणी आरोग्य अधिकारी/कर्मचारी यांचेमार्फत करण्यात येणार आहे.
“स्पर्श” कुष्ठरोग जनजागृती अभियान आणि “कुसुम” अभियान उद्दिष्ट व उद्देश :-
नवीन सांसर्गिक कुष्ठरोग्ण शोधून बहुविध औषध उपचाराखाली आणून संसर्गाची साखळी खंडित होऊन रोगाचा होणारा प्रसार कमी करणे. समाजात कुष्ठरोग विषयी जनजागृती करणे. कुष्ठरोगला विषयी भेदभाव व कलंक नाहीसा करणे. जिल्ह्यातील कुष्ठ रुग्णांचे प्रमाण शून्यावर आणणे. जिल्ह्यातील विकृती कुष्ठ रुग्णांचे प्रमाण शून्यावर आणणे. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 2026 मोहिमेमध्ये कुष्ठरोग विषयी समाजात जनजागृती करणे व “कुसुम” अभियानांतर्गत समाजातील दडून राहिलेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना खाली आणणे व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
कुष्ठरोगाची संशयित लक्षणे :
शरीरावरील कोणताही लालसर फिकट, न खाजवणारा चट्टा, तेलकट, गुळगुळीत, चकाकणारी त्वचा तसेच कानाच्या पाळीवर व शरीरावर गाठी येणे, हातांच्या बोटांमध्ये व पायांच्या पंजामध्ये अशक्तपणा व कमजोरी येणे.
0000000
Comments
Post a Comment