दर्पण पुरस्कार म्हणजे पत्रकारांच्या कार्याला मिळालेला सर्वोच्च सन्मान – सभापती प्रा. राम शिंदे

सिंधुदुर्गनगरी, दि. 06 (जिमाका): पत्रकारांना ‘दर्पण’ नावाने दिला जाणारा पुरस्कार हा त्यांच्या जीवनातील केवळ सन्मान नसून सर्वोच्च गौरव आहे. कारण या पुरस्कारामागे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे तेजस्वी नाव जोडलेले आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी केले. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय मराठी पत्रकार दिन व दर्पण पुरस्कार सोहळा पोंभुर्ले येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रा. राम शिंदे म्हणाले की, येत्या सहा वर्षांत आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ द्विशताब्दी वर्ष साजरे होणार असून, त्या निमित्ताने भव्य आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात येतील. तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी आवश्यक असलेला निधी आपल्या स्थानिक विकास निधीतून मंजूर केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सोहळ्यास संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ, जिल्हाधिकारी तृप्ती थोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, माजी आमदार प्रमोद जठार, उपविभागीय अधिकारी जगदीश काटकर, तहसीलदार आ. जे. पवार, उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, पोंभुर्ले गावच्या सरपंच प्रियंका आवाडे, आकाशवाणीचे माजी संचालक जयू भाटकर, ज्येष्ठ पत्रकार, पत्रकार बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची दिंडी काढण्यात आली असून, तिचे पूजन सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. पुरस्कार वितरण: राज्यस्तरीय विशेष दर्पण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे यांना प्रदान करण्यात आला. राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार पुढील मान्यवरांना देण्यात आले – शंतनु डोईफोडे – संपादक, दैनिक प्रजावाणी, नांदेड बसवेश्वर चेणगे – संपादक, गुंफण दिवाळी अंक, सातारा युवराज पाटील – जिल्हा माहिती अधिकारी, पुणे जीवनधर चव्हाण – ज्येष्ठ पत्रकार, सातारा प्रकाश कुलथे – संपादक, दै. स्नेहप्रकाश, श्रीरामपूर विजय पालकर – दै. लोकमत, सिंधुदुर्ग श्रीराम जोशी – कार्यकारी संपादक, दै. नगर टाईम्स, अहिल्यानगर अनिल काळबांडे – शहर प्रतिनिधी, दै. सकाळ, यवतमाळ आशिष कदम – केंद्रप्रमुख, मँगो एफ.एम. तथा संपादक, साप्ताहिक वर्तमान *

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'