हिंद दी चादर कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी भाविकांना लंगर वाढून केली सेवा

नांदेड, दि. २५ जानेवारी:-“हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांनी प्रत्यक्ष लंगर वाढून भाविकांची सेवा केली. जिल्हाधिकारी यांनी रांगेत बसलेल्या भाविकांना लंगर सेवा केल्याने उपस्थितांमध्ये विशेष उत्साह व समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. सेवा, समता व बंधुभावाचा संदेश देणाऱ्या लंगर परंपरेचे महत्त्व यावेळी अधोरेखित झाले. जिल्हाधिकारी यांनी लंगर सेवेत सहभागी होत शीख परंपरेतील सेवाभाव, मानवता व समतेच्या मूल्यांना अभिवादन केले.ही लंगर सेवा २४ तास भाविकांच्या सेवेसाठी खुली आहे. शहीदी समागमाच्या निमित्ताने नांदेड येथे देश-विदेशातून भाविक उपस्थित असून, संपूर्ण परिसर भक्तिमय व सेवाभावी वातावरणाने भारावून गेला आहे. या कार्यक्रमातून श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या त्याग, धर्मनिष्ठा व मानवतेच्या संदेशाचा जागर करण्यात येत आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'