क्रीडा धोरणांतर्गत ५ टक्के आरक्षणासाठी ब्लॉकचेन आधारित क्रीडा ई-प्रमाण प्रणाली कार्यान्वित
सिंधुदुर्गनगरी दिनांक 19 (जिमाका) :- राज्यातील गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवेतील 5 टक्के आरक्षणाचा लाभपारदर्शक, जलद आणि त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा, या उद्देशाने शासनाने "ब्लॉकचेन"(Blokchain) च "कृत्रिम बुद्धिमता"(Artificil Intelligence) या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयानुसार जुनी कागदपत्रांवर आधारित पडताळणी प्रक्रिया बंद करुन, पूर्णत: डिजिटल क्रीडा ई-प्रमाण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
या अंमलबजावणीसाठी क्रीडा संघटनांनी या कार्यप्रणालीची तत्काळ माहिती द्यावी. अभिलेख जतन अंतर्गत स्पर्धा संपन्न झाल्यापासून 7 दिवसांच्या आत, स्पर्धेचा अंतिम निकाल, सहभागी खेळाडूंची यादी आणि गुणपत्रिका या माहितीची फाईल क्रीडा ई प्रमाण पोर्टल https://soprts.maharashtra.gov,in वर अपलोड करण्यासाठी संचालनालयाला सादर करणे संघटनांवर बंधनकारक राहील. ही माहिती संबंधित संघटनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांने डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणित करणे आवश्यक आहे. जी संघटना विहित 7 दिवसांच्या मुदतीत माहिती ब्लॉकचेनवर अपलोड करणार नाही, अशा परिस्थितीत खेळाडूंचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संघटनेची राहील.
खेळाडूंच्या नोंदणी प्रक्रियेंतर्गत खेळाडूंनी क्रीडा ई- प्रमाण पोर्टलवर आपल्या आधार- संलग्न आयडीव्दारे लॉग –इन करुन नोंदणी करणे अनिवार्य आहे. खेळाडूंनी सादर केलेली माहिती आणि संघटनेने ब्लॉकचेनवर अपलोड केलेला अभिलेख (रेकॉर्ड हॅश) यांची प्रणालीद्वारे स्वयंचलित पडताळणी होईल. त्यामुळे खेळाडूंना यापुढे पडताळणीसाठी प्रत्यक्ष विभागीय कार्यालयात जाण्याची किंवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. तांत्रिक कारणास्तव एखाद्य खेळाडूचे प्रमाणपत्र नामंजूर झाल्यास, तक्रार करण्याची व तक्रारी नंतरही खेळाडूस प्रमाणपत्र न मिळाल्यास 30 दिवसांच्या आत ऑनलाईन अपील करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाशी संपर्क साधण्याचे, आवाहन जिल्ह क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
0000000
Comments
Post a Comment