घरकुल लाभार्थ्यांसाठी सौर ऊर्जा संयंत्राबाबत आढावा व मार्गदर्शन सभा संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 19 (जिमाका) :- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण सन 2024-25 व सन 2025-26 या सह राज्य पुरस्कृत घरकुल योजनांचा लाभ घेऊन घरकुले पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना सौर उर्जा संयंत्र बसविणे बाबतची आढावा व मार्गदर्शन सभा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. ही सभा मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्या कार्यालयात पार पडली, या सभेसाठी महावितरणचे अधिकारी प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा सिंधुदुर्ग व जिल्ह्यातील नोंदणीकृत सौर उर्जा संयंत्र पुरवठेदार व शासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शासनाच्या मार्गदर्शक योजना निर्देशानुसार प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण टप्पा-2, राज्य पुरस्कृत आवास योजना (रमाई आवास योजना इ.) योजनांतर्गत जी घरकुले पुर्ण झाली आहेत. अशा लाभार्थ्यांनी सौर उर्जा संयंत्र बसविल्यास उर्जा निर्मिती होणार असून ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना यांचा दुरगामी फायदा होणार आहे. यासाठी शासनाकडून घरकुल लाभार्थ्यांना 15,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. ही योजना लोककल्याणकारी व उर्जा निर्माण करणारी आहे. यामध्ये ग्रामीण भागातील लाभार्थ्यांची आर्थिक उन्नती होणार आहे. यासाठी शासनाच्या https://https://pmsuryaghar.gov.in पोर्टलवर नोंदणीकृत असलेल्या सोलर व्हेंडर्सची सभा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्ह्यातील सर्व भागातून व्हेंडर्स प्रतिनिधी उपलब्ध होते. या जनकल्याणकारी योजनेबाबत सर्व पात्र लाभार्थ्यांना यासाठी उपयुक्त करावे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर याबाबतचे मेळावे घेवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना सोलर युनिट बसविणेबाबत जनजागृती करण्याचे ठरविण्यात आले. सोलर युनिट बसविण्याबाबत गावातील स्वयंसहाय्यता गट, ग्रामसंघ तसेच प्रभागसंघ यांना जनजागृती करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले आहे. ०००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'