शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतर्गत भव्य क्रीडा स्पर्धा संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि. 6 (जि.मा.का):- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सिंधुदुर्ग तसेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना शाखा शासकीय वैद्यकीय महाविद्यलय, यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ते 4 जानेवारी 2026 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, सिधुदुर्ग येथे भव्य वार्षिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुगणालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांनी दिली. स्पर्धेचे उद्घाटन अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या हस्ते करण्यात आले. क्रिकेटच्या सामन्यांमध्ये एकूण 16 पुरुष संघ व एकूण 6 महिला संघानी सहभाग घेतला होता. पुरुष गटाच्या अंतिम सामन्यात 'OPD वॉरियर्स' संघाने विजेतेपद पटकावले, तर GMC डॉक्टर्स' संघास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिला गटः 'GNM नर्सिंग गर्ल्स संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर 'ब्लड बँक व सिस्टर्स संघ उपविजेता ठरला. अष्टपैलू पुरुष खेळाडू पुरस्कार विजेते उत्कृष्ट फलदाज डॉ. विजय वाघमारे, मॅन ऑफ द टुरनामेंट- रूपेश सावंत, उत्कृष्ट गोलंदाज विशाल माने, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पकज आदुर्लेकर. अष्टपैलू महिला खेळाडू पुरस्कार विजेते उत्कृष्ट फलदाज कु. सायली साळगावकर, मॅन ऑफ द दुरनामेंट- कु. लक्ष्मी नाईक, उत्कृष्ट गोलंदाज श्रीम. जयश्री वसावे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कु. स्नेहल कांबळे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पारितोषिक वितरण अंतिम सामन्याचा टॉस व स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे याच्या हस्ते करण्यात आले. विजेत्या संघाना आणि वैयक्तिक स्तरावर उत्कृष्ट खेळाडूंना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या खिळाडूवृ‌तीचे विशेष कौतुक केले. या सोहळ्याला अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, उप-अधिष्ठाता डॉ. संतोष फुपरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिल्पा नारायणकर, व सर्व विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि वि‌द्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सामुदायिक प्रयत्नामुळे हा क्रीडा महोत्सव यशस्वीरित्या संपन्न झाला. समाजसेवा अधिक्षक नितीन तुरनर यांनी सर्वांचे आभार मानले. ००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'