राज्य क्रीडा दिनानिमित्त खेळाडूंच्या सत्कार समारंभाचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 19 (जिमाका) :- स्व. खाशाबा जाधव हे भारतीय फ्रीस्टाईल कुस्तीपटू होते. हेलसिंकी येथील १९५२ मधील उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे ते स्वतंत्र भारतातील आणि महाराष्ट्रातील पहिले मल्ल होते. त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीबद्दल त्यांचा जन्मदिवस १५ जानेवारी "राज्य क्रीडा दिन" म्हणून साजरा केला जातो. याअनुषंगाने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील शालेय क्रीडा स्पर्धामध्ये राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा सत्कार समारंभ २१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृह, सिंधुदुर्गनगरी येथे निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, यांच्या अध्यक्षतेखाली व आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर वेंगुर्ला तहसिलदार ओकार ओतारी, याच्या हस्ते जिल्ह्यातील राज्यस्तरीय पदक प्राप्त, राष्ट्रीय पदक प्राप्त व सहभागी खेळाडूंच्या सत्कार करण्यात येणार आहे. तसेच खेलो इंडिया कबड्डी प्रशिक्षण केंद्र, सिंधुदुर्ग सावंतवाडी, सिंधुदुर्गच्या खेळाडूंना खेळ साहित्य (कीट) वाटप केले जाणार आहे. तरुण पिढीला खेळाकडे आकर्षित करणे, खेळाचे महत्व पटवून देऊन शारीरिक तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणे हे या सत्कार समारंभाचे मूळ उद्दिष्ट आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील १४ खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे आहेत. राष्ट्रीयस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ प्राविण्य व सहभागी झालेल्या खेळाडूंची यादी १ कु. आर्यन जगदीश दुधवडकर क्रिकेट १९ वर्षे मुले श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी, ता. सावंतवाडी सहभाग (शालेय) २ कु. आयुष दत्‍तप्रसाद पाटणकर रायफल शुटींग १९ वर्षे मुले सहभाग (शालेय) ३ कु. मिताली संतोष गावडे कबड्डी १९ वर्षे मुली कुडाळ हायस्‍कुल व ज्‍युनिअर कॉलेज ता. कुडाळ सहभाग (संघटना) ४ कु. प्रज्योती श्रीकांत जाधव तायक्वांदो १९ वर्षे मुली माध्‍यमिक विद्यामंदिर कनेडी, ता. कणकवली तृतीय (संघटना) सहभाग (शालेय) राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ प्राविण्य प्राप्‍त केलेल्या खेळाडूंची यादी १ कु. स्वप्निल मंगेश लाखे कॅरम १९ वर्षे मुले कणकवली कॉलेज कणकवली, ता. कणकवली सहावा (शालेय) २ कु. जान्‍हवी प्रवीण सोनार कॅरम १४ वर्षे मुली विद्यामंदिर इंग्लिश मेडीयम स्‍कूल कणकवली, ता. कणकवली चौथा (शालेय) ३ कु. अमुल्‍य अरुण घाडी कॅरम १७ वर्षे मुले श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी, ता. सावंतवाडी चौथा (शालेय) ४ कु. यशश्री संतोष दिवेकर ज्‍युदो १४ वर्षे मुली नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करुळ, ता. कणकवली तृतीय (शालेय) ५ कु. लक्ष्‍मण सुरेश जंगले किक बॉक्सिंग १७ वर्षे मुले कै. बाबुराव पाटयेकर माध्‍य. विद्यालय दाणोली, ता. सावंतवाडी तृतीय (शालेय) ६ कु. सुरेखा बिरु काळे किक बॉक्सिंग १७ वर्षे मुली कै. बाबुराव पाटयेकर माध्‍य. विद्यालय दाणोली, ता. सावंतवाडी तृतीय (शालेय) ७ कु. दिव्‍या दिलीप राणे कॅरम १४ वर्षे मुली डॉन बॉस्‍को हायस्‍कूल अॅंड ज्‍युनिअर कॉलेज ओरोस, ता. कुडाळ द्वितीय (शालेय) ८ कु. प्रणिता नथुराम आयरे कॅरम १९ वर्षे मुली राणी पार्वती देवी हायस्कूल सावंतवाडी, ता. सावंतवाडी द्वितीय (शालेय) ९ कु. भावेश भगवान गवस किक बॉक्सिंग १९ वर्षे मुले खेमराज मेमोरियल इंग्लिश स्‍कूल, बांदा, सावंतवाडी, ता. सावंतवाडी द्वितीय (शालेय) १० कु. तन्‍वी संतोष पारकर ज्‍युदो १९ वर्षे मुली कणकवली कॉलेज कणकवली, ता. कणकवली प्रथम (शालेय) 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'