टपाल पेन्शनधारकांच्या तक्रारींसाठी २७ जानेवारीला पेन्शन अदालतीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक ०२ (जिमाका) :- टपाल विभागाच्या पेन्शनधारकांच्या तक्रारींचे प्रभावीपणे निवारण करण्यासाठी, गोवा टपाल क्षेत्रामार्फत टपाल पेन्शन अदालत मंगळवार दि. २७ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजता पोस्टमास्टर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी -४०३००१ यांच्या कार्यालयात आयोजित केली जाणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग विभागाचे अधीक्षक डाकघर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. गोवा टपाल क्षेत्राची (ज्यामध्ये गोवा राज्य, महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे.) जे कर्मचारी टपाल विभागातून सेवेत असताना सेवानिवृत्त झाले आहेत/मृत्यू पावले आहेत (टपाल विभागाचे पेन्शनधारक) आणि ज्यांची पेन्शन ३ महिन्यांच्या आत मंजूर झालेली नाही, अशांच्या पेन्शन आणि पेन्शनविषयक लाभांसंबंधीच्या तक्रारी/गाऱ्हाणी या पेन्शन अदालतीत विचारात घेतली जातील. केवळ वारसा हक्काचे वाद आणि धोरणात्मक बाबींशी संबंधित तक्रारी टपाल पेन्शन अदालतीत विचारात घेतल्या जाणार नाहीत. पेन्शनधारकांनी विहित नमुन्यात, महेश एन, वरिष्ठ लेखा अधिकारी/सचिव, पेन्शन अदालत, पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय, गोवा क्षेत्र, पणजी-४०३००१, ईमेल आयडी accts.goa@indiapost.gov.in या पत्त्यावर दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. दिनांक १५ जानेवारी २०२६ नंतर प्राप्त झालेले अर्ज प्रस्तावित पेन्शन अदालतीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत, असेही टपाल विभागाने कळविले आहे. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'