पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त ५ जानेवारीला मोटारसायकल रॅलीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक ०२ (जिमाका) :- महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापन दिन (रेझींग डे) २ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने २ ते ८ जानेवारी २०२६ या कालावधीत सिंधुदुर्ग पोलीस दलाकडून विविध जनजागृतीपर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्ग पोलीस दल व उप प्रादेशिक परिवहन विभागांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, ५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजता मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोटारसायकल रॅली पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर व अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या रॅलीचा प्रारंभ कुणकेश्वर, तालुका देवगड येथून होणार असून ती सागरी महामार्गाने कुणकेश्वर–आचरा–मालवण–निवती–वेंगुर्ला अशी जात वेंगुर्ला येथील बॅ. नाथ पै क्रीडांगण येथे समाप्त होणार आहे. या मोटारसायकल रॅलीत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी स्वतःची मोटारसायकल घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे. रॅलीमध्ये सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी QR कोड स्कॅन करून आपली नोंदणी करावी, असेही कळविण्यात आले आहे. सोबत :- QR कोड ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'