मराठी शब्दांचा उत्सव : अभिवाचन-काव्यवाचनाची रंगतदार मैफल सिंधुदुर्गनगरीत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती; रसिकांसाठी काव्यवाचनाची साहित्यिक मेजवानी

सिंधुदुर्गनगरी, दि. २७ (जि.मा.का.) – मराठी भाषेच्या संवर्धनाचा जागर करणाऱ्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त सिंधुदुर्गनगरीत अभिवाचन आणि काव्यवाचनाचा विशेष साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या वेळी कवयित्री मिनाक्षी पाटील लिखित “ललद्यदस् ललबाय” या पुस्तकाचे अभिवाचन ज्येष्ठ साहित्यप्रेमी वामन मधुसूदन पंडित करणार असून, रसिकांसाठी मनाला स्पर्शून जाणाऱ्या काव्यवाचनाची रंगतदार मैफल देखील सजणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय तसेच कोकण मराठी साहित्य परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम बुधवार, दि.२८ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता, आरमार प्रमुख मायनाक भंडारी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस, सिंधुदुर्ग येथे संपन्न होणार आहे. नागरिकांनी व साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 0000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'