पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाचे भूमिपूजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक ०३ (जिमाका) :- पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयीन इमारतीच्या कामाचा भूमिपूजन समारंभ रविवार ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या समारभ प्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार नारायण राणे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास सर्वश्री आमदार अॅड. निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, दीपक केसरकर, निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कोकण प्रादेशिक विभाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सावंतवाडी येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय येथे संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी समीर घारे, अधिक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता पूजा इंगवले, सहाय्यक अभियंता अजित पाटील यांनी केले आहे. ००००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'