जीवनावश्यक वस्तूंवरील GST दरात कपात 22 सप्टेंबर 2025 पासून नवे दर लागू
सिंधुदुर्गनगरी दिनांक 31 (जिमाका) :- वस्तू व सेवा परिषदेच्या 56 व्या बैठकीत सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला असून अनेक दैनंदिन जीवनावश्यक वस्तू व सेवांवरील GST दरात कपात करण्यात आली आहे. हे दर 22 सप्टेंबर 2025 पासून लागू झाल्याची माहिती राज्यकर उपआयुक्त (प्रशासन) यांनी दिले आहे.
त्यानुसार दैनंदिन जीवनावश्यक वस्तू जसे की, केशतेल, साबण, शाम्पू, टूथब्रश, टुथपेस्ट, दुचाकी, स्वयंपाक घरातील साहित्य यावरील जीएसटी दर 18 टक्के किंवा 12 टक्के वरुन 5 टक्के करण्यात आला आहे. तसेच UHT दूध इंडियन ब्रेड्स (चपाती,रोटी,पराठा, परोट्टा), पॅकबंद व लेबल केलेले पनीर यावरील जीएसटी दर 5 टक्के वरुन शून्य करण्यात आला आहे. तसेच पॅकबंद नमकीन, भुजिया, सॉसेस, पास्ता, इन्स्टंट नूडल्स चॉकलेट, कॉफी, कॉर्नफ्लेक्स, लोणी, तूप इत्यादी वरील जीएसटी दर 18 टक्के किंवा 12 टक्के वरुन 5 टक्के करण्यात आला आहे. वातानुकूलन यंत्रे, टीव्ही, डिश वॉशर, छोट्या कार 350 CC पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकी ई. वरील जीएसटी दर 28 टक्के वरुन 18 टक्के करण्यात आला आहे.
उपरोक्त प्रमाणे वस्तू व सेवांवरील कराचे दर सर्व व्यावसायिकांनी लागू करावेत व त्यानुसारच ग्राहकांककडून कर आकारणी करावी. योग्य दराने वस्तू सव सेवा कराची आकरणी न करण्याबाबत महाराष्ट्र वस्तू व सेवा कर कायद्याच्या कलम 122 अंतर्गत दंडाची तरतूद आहे.
कोणतेही व्यावसायिक बदल झालेल्या दरानुसार कर आकारणी करत नसल्यास राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण कक्ष संपर्क क्रमांक 1995 वर किंवा व्दारे 8800001915 या क्रमांकावर याबाबतची तक्रार नोंदवावी अशी विनंती करण्यात येते. अधिक माहितीसाठी विभागाच्या www.cbic_gst.gov.in या संकेस्थळावरील अधिसूचना आणि परिपत्रक यांचा संदर्भ घ्यावा,असे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment