पिक विमा योजनेच्या लाभासाठी ई-पिक पाहणी बंधनकारक शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी दिनांक 31 (जिमाका) :- प्रधानमंत्री पिक विमा योजना व पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना आंबिया बहार सन 2025-26 या योजनांमध्ये नुकसान भरपाई मिळण्यसाठी ई-पिक पाहण्याची अट विहित करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पात्र शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
ई-पिक पाहणी पूर्ण करण्याची सुधारित अंतिम कालमर्यादा दिनांक 15 जानेवारी 2026 अशी आहे. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यापासुन पात्र शेतकरी वंचित राहू नये याकरिता पुनर्रचित हवामानावार आधारित फळपिक विमा योजनेत सहभागी सर्व शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी विहित वेळेत पूर्ण करावी. याविषयी कालमर्यादा कमी असल्याने फळपिक विमा योजनेत सहभाग घेतलेल्या सर्व आंबा व काजू बागायतदारांची ई-पिक पाहणी लवकरात लवकर पूर्ण करावी. त्याचप्रामणे सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत उन्हाही भात व उन्हाळी भुईमूग पिक या पिकांसाठी सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 अशी असल्याने सहभागी होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी वेळीच पूर्ण करावी.
०००००
Comments
Post a Comment