जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांच्यावतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

सिंधुदुर्गनगरी, दि.२७ (जि.मा.का):- संविधान दिनाच्या औचित्याने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांनी जिल्हा परिषद सिंधुदुर्गनगरीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे स्पर्धा परिक्षा तयारी करणाऱ्या मुलांसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न झाल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योगकता मार्गदर्शन कार्यालयाने प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. या शिबिराचा उद्देश स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी, युवक यांच्यात आत्मविश्वास वाढविणे, संवाद कौशल्य, सॉफ्ट स्किल्स विकसीत करणे व त्याव्दारे रोजगारक्षमतेत वाढ घडवून आणणे हा होता. तसेच याव्दारे विद्यार्थ्यांना आपल्या संविधानात अंतर्भूत असलेल्या जबाबदारी, समानता आणि प्रामाणिकतेच्या मूल्यांचे प्रत्यक्ष जीवनात पालन करण्यास प्रोत्साहन प्राप्त करून देणे हा होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी, तृप्ती धोडमिसे, यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांचे स्वागत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सहायक आयुक्त भैय्याजी येरमे, यांनी संविधानाची पुस्तके देऊन केले. यावेळी उपस्थित सर्वांनी संविधान उद्देशिका व संविधान प्रतिज्ञा याचे वाचन केले. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाले, आपले ध्येय कसे पक्के करावे, परिक्षेचे स्वरुप समजून अभ्याक्रमाचे नियोजन करुन आपले ध्येय कसे साधता येईल. सध्या उपलब्ध सोशल मिडयावरील माहितीचा भडिमारापासून दूर राहून स्मार्ट प्लान बनवा. स्वत:चा ताण सहन करता आला तर तुम्हाला ऑफिसचा ताण सहन करता येईल. आपल्या आजूबाजूला सकारात्मक लोकांच संपर्क ठेवा यावर मार्गदर्शन केले. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, यांनी विद्यार्थ्यांशी वार्तालाभ केला. मुलांना स्पर्धा परिक्षांची तयारी करताना येणाऱ्या समस्या, प्रशासनात का यायचे? उद्देश काय? मुलांना काय समस्या येतात त्या जाणून घेऊन लवकरच सिंधुदुर्ग जिल्हयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्याची ग्वाही दिली. या उपक्रमास जिल्हाधिकारी यांनीही आपणही सर्वतोपरी सहकार्य करु असे आश्वासन दिले. या कार्याक्रमासाठी प्रमुख वक्ते, मार्गदर्शक म्हणून स्पर्धा परिक्षेत यश संपादन करुन प्रशासकिय सेवेत कार्यरत सिंधुदुर्ग कन्या अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांनी आपण शालेय जीवनात प्रशासकिय सेवेत येण्याचे ठरविलेले ध्येय व त्याची परिपूर्ती असा सर्व प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला. स्पर्धा परिक्षांची तयारी करताना प्लान बी चे पण नियोजन करून ठेवावे. आपले ध्येय निश्चित केल्याशिवाय आपण ते ध्येय साध्य करु शकत नाही. तसेच आपल्या सारखे जिल्ह्यातील प्रशासकिय सेवेत विद्यार्थी यावेत यासाठी आपण नेहमीच मार्गदर्शन करु असे आश्वासित केले. या कार्याक्रमासाठी लाभलेले वक्ते/मार्गदर्शक (महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2024 गट अ, Rank 28) कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी सुरज देबाजे, यांनी आपला प्रशासकिय सेवेतील प्रवास, आपल्यावरील विश्वासाची ताकद जाणून परीक्षांना कसे सामोरे जावे याबाबबत मार्गदर्शन केले. अभ्यासासोबत स्वत:ला वेळ देणे, स्वत:चे छंद पण जोपासले पाहिजेत. स्वत:चे वेळापत्रक कसे बनवावे याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, ग्रंथालय वाचक महाविद्यालयीन कॉलेज कट्टा उपक्रमाचे विद्यार्थी तसेव कार्यालयीन कर्मचारी बहुसंख्य संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कौशल्य विकास अधिकारी अमिन तडवी यांनी केले. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'