उद्योजकता मेळावा उत्साहात संपन्न

सिंधुदुर्गनगरी दिनांक 31 (जिमाका) :- प्रत्यक्ष उद्योजकासोबत संवाद साधत त्यांच्या उद्योगातील अडचणी समजून घेण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग, दे आसरा फाउंडेशन व संत राऊळ महाराज महाविद्यालय, एस. एन. देसाई चौक, कुडाळ, यांच्या संयुक्त विद्यमाने 24 डिसेंबर 2025 रोजी उद्योजक, लघु उद्योजक, पारंपारिक कारागीर व महिला उद्योजक यांच्यासाठी उद्योजकता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या उद्योजकता मेळाव्याचे उद्घाटन कुडाळ संत राऊळ महाराज महाविद्यालय प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, यांनी केले. दे आसरा फाउंडेशन प्रोग्रॅम मॅनेजर डॉ. आनंद गोडसे, अपग्रोथ फाउंडेशन, प्रोग्रॅम मॅनेजर तेजस धारकर, कौशल्य विकास अधिकारी अ.इ.तडवी, परि. कौशल्य विकास अधिकारी सु.वा. देवाजे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर मान्यवरांचे स्वागत कौशल्य विकास अधिकारी श्री. तडवी यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. दे आसरा फाऊंडेशनचे प्रोग्रॅम मॅनेजर डॉ. आनंद गोडसे यांनी "व्यवसाय वाढीसाठी उत्तम नेटवर्किंग कसे करावे, या विषयावर उद्योजकांना मार्गदर्शन केले. तसेच अपग्रोथचे प्रोग्रॅम मॅनेजर तेजस धारकर यांनी सोशल मिडीया मार्केटिंग" या विषयावर मार्गदर्शन करत सोशल मिडीयाचा वापर करून आपल्या उद्योगांचा प्रसार कशा प्रकारे केला पाहिजे यासाठी मार्गदर्शन केले. या उद्योजकता मेळाव्यात सुमारे 80 लघु उद्योजक, पारंपारिक कारागीर व महिला उद्योजकांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आमार प्रदर्शन परि. कौशल्य विकास अधिकारी देबाजे यांनी केले. या कार्यक्रमासाठी संत राऊळ महाराज महाविद्यालय व त्यांचे कर्मचारी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सिंधुदुर्ग यांचे कर्मचारी, दे आसरा फाऊंडेशन, पी.एम. विश्वकर्मा जिल्हा समन्वयक, माविम या सर्वांचे सहकार्य लाभले. ०००००

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'