सैनिक कल्याण विभागातील लिपिक–टंकलेखक पदांसाठी 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी, दि. 10 (जि.मा.का):- महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग पुणे व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट क) एकूण 72 पदाकरिता 31 डिसेंबर 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील लिपिक टंकलेखक (गट क) एकूण 72 पदाकरिता महाराष्ट्र राज्याचे अधिवास असलेल्या माजी सैनिक व सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार युद्धकाळात किंवा युद्ध नसताना सैनिकी सेवेत मृत झालेल्या किंवा अपंगत्व येऊन त्यावेळी नोकरीसाठी अयोग्य झालेल्या माजी सैनिकांच्या कुटुंबातील फक्त एका व्यक्तीस त्यानंतरच्या पसंतीक्रमांने पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. वरील पदांपैकी 3 पद हे अपंग संवर्गातून किमान 40 टक्के अपंगत्व असलेल्या उमेदवारांमधून दिव्यांगत्वाचा प्रकारानुसार कर्तव्य व जबाबदारीचा विचार करून गुणवत्ता उपलब्धतेनुसार भरण्यात येईल. ही भरती प्रक्रिया टीसीएस -आयओएन यांच्यामार्फत होणारे आहे. परीक्षासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येतील इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत, पात्र उमेदवारांनी वेव- बेस्ड (Web-Based) ऑनलाईन अर्ज www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेस्थळावर 31 डिसेंबर 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत सादर करणे आवश्यक राहील. त्यानंतर वेबलिंक बंद होईल. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'