सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकशाहीचा उत्सव: चारही नगर क्षेत्रांत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्ग दि. २ (जिमाका) जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी या तीन नगरपरिषदांमध्ये आणि कणकवली नगरपंचायतीमध्ये आज सकाळी ७.३० ते दुपारी ५.३० वाजेपर्यंत झालेल्या मतदानाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्याने पुन्हा एकदा लोकशाहीप्रती असलेली निष्ठा आणि सहभाग दाखवून दिला. संपूर्ण जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत, सुयोग्य नियोजनात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा दिसू लागल्या. सर्व वयोगटातील मतदारांसह तरुणाईनेही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली. नववधूंचा खास सहभाग या निवडणुकीत अनेक मतदान केंद्रांवर हृदयस्पर्शी दृश्ये पाहायला मिळाली. लग्नाच्या वेशात नववधूंनीही थेट विवाह स्थळावरून मतदान केंद्रावर येत आपला मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीप्रती आस्था आणि कर्तव्याची जाणीव दाखवणारे हे चित्र सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. प्रशासनाचा सजग आणि शिस्तबद्ध कारभार जिल्हा प्रशासनाने निवडणूक प्रक्रियेसाठी काटेकोर तयारी केली होती. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी स्वतः मालवण शहरातील मतदान केंद्रांना भेट देत संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला. मतदान केंद्रांवरील सुविधा, मतदार मार्गदर्शन आणि एकूणच व्यवस्थापनाची पाहणी करत त्यांनी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू न देता, नागरिकांनी निर्धास्तपणे मतदानाचा हक्क बजावला. सुव्यवस्थित निवडणूक प्रक्रियेबद्दल समाधान मतदान केंद्रावरील सुविधा, अपंग व वरिष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सुविधा आणि मतदार मार्गदर्शन यांची प्रशंसनीय व्यवस्था दिसून आली. मतदान सुरळीत पार पडल्याबद्दल मतदारांनीही समाधान व्यक्त केले. जिल्ह्यातील 3 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीसाठी आज एकुण 74 मतदान केंद्रांवर 57207 मतदारांपैकी 42224 मतदारांनी मतदान केले. यामध्ये पुरुष 20954 तर महिला 21270 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे नगरपालिकेचे नाव, एकूण मतदार, झालेले मतदान व टक्केवारी खालील प्रमाणे सावंतवाडी – 19429 पैकी 13475, झालेले मतदान 69.36 टक्के मालवण – 14385 पैकी 10651, झालेले मतदान 74.06 टक्के वेंगुर्ला – 10115 पैकी 7514, झालेले मतदान 74.29 टक्के कणकवली – 13278 पैकी 10584, झालेले मतदान 79.71 टक्के जिल्ह्यात प्रत्यक्ष निवडणुकीकरिता एकूण मतदान केंद्र ७४ एकूण मतदार - ५७२०७ सावंतवाडी नगरपरिषद एकूण मतदान केंद्र- २१ एकूण मतदार – १९४२९ मालवण नगरपरिषद एकूण मतदान केंद्र- २० एकूण मतदार - १४३८५ वेंगुर्ला नगरपरिषद एकूण मतदान केंद्र १६ एकूण मतदार – १०११५ कणकवली नगरपंचायत एकूण मतदान केंद्र- १७ एकूण मतदार – १३२७८ जिल्ह्यात प्रत्यक्ष निवडणुकीकरिता एकूण कंट्रोल यूनिट १२९ व बॅलेट यूनिट २५८ वापरण्यात येणार आहेत. सावंतवाडी नगरपरिषदेकरिता कंट्रोल यूनिट ३३ व बॅलेट यूनिट ६६ मालवण नगरपरिषदेकरिता कंट्रोल यूनिट ३२ व बॅलेट यूनिट ६४ वेंगुर्ला नगरपरिषदेकरिता कंट्रोल यूनिट २८ व बॅलेट यूनिट ५६ कणकवली नगरपंचायतीकरिता कंट्रोल यूनिट ३६ व बॅलेट यूनिट ७२ **

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'