स्वच्छता मोहिमेत 32 हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग
सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का):- जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून 20 डिसेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, ग्रामपंचायत, आरोग्यकेंद्र, आरोग्य उपकेंद्र व परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांत जिल्ह्यातील 32 हजार 118जनांनी श्रमदान करुन 3 हजार 620 किलो कचरा गोळा केला आहे. या कार्यक्रमांत 795 शाळा, 245 आरोग्यकेंद्र, उपकेंद्र तर 396 ग्रामपंचायत कार्यालयानी सहभाग घेतला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा स्वच्छ जिल्हा म्हणुन देशात प्रसिध्द आहे. स्वच्छतेबाबत जनजागृती होण्याकरीता 20 डिसेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, ग्रामपंचायत, आरोग्यकेंद्र, आरोग्य उपकेंद्र व परिसर स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शालेय स्वच्छता कार्यक्रमांत शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी वर्ग खोल्याची साफसफाई, शाळा परिसर स्वच्छता आदी कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता. तर ग्रामपंचायत कार्यालय स्वच्छता कार्यक्रमांत ग्रामपंचायत कार्यालय व परिसर स्वच्छता करण्यात आली आहे. तसेच अभिलेख वर्गिकरण, अधिकारी व कर्मचारी यांची टेबल, कपाट स्वच्छता, ग्रामपंचायत कार्यालय निटनेटके करणे, दिशादर्शक बोर्ड लावणे, रंगरगोटी करणे आदी कार्यक्रमांचे समावेश करण्यात आला होता. आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र स्वच्छता कार्यक्रमांत कार्यालय व परिसर स्वच्छता व रंगरगोटी श्रमदानाच्या माध्यमातून करणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमांत जिल्हा वासियांनी उस्फूर्त प्रतिसाद देत श्रमदान केले आहे. शाळा व शाळा परिसर स्वच्छता कार्यक्रमांत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 795 शाळानी सहभाग घेत 26 हजार 761 जनांनी श्रमदान करुन 1 हजार 584 किलो कचरा एकत्र केला आहे. यामध्ये देवगड तालुक्यातील 99 शाळांनी सहभाग घेत 3 हजार 391 जनांच्या श्रमदानातुन 275 किलो कचरा एकत्र केला आहे. कणकवली तालुक्यातील 264 शाळांनी सहभाग घेत 12 हजार 663 जनांच्या श्रमदानातुन 273 किलो कचरा एकत्र केला आहे. वैभववाडी तालुक्यातील 59 शाळांनी सहभाग घेत 1 हजार 801 जनांच्या श्रमदानातुन 107.50 किलो कचरा एकत्र केला आहे. मालवण तालुक्यातील 105 शाळांनी सहभाग घेत 3 हजार 161 जनांच्या श्रमदानातुन 441 किलो कचरा एकत्र केला आहे. कुडाळ तालुक्यातील 22 शाळांनी सहभाग घेत 201 जनांच्या श्रमदानातुन 40 किलो कचरा एकत्र केला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील 53 शाळांनी सहभाग घेत 1 हजार 90 जनांच्या श्रमदानातुन 71 किलो कचरा एकत्र केला आहे. सावंतवाडी तालुक्यातील 101 शाळांनी सहभाग घेत 2 हजार 988 जनांच्या श्रमदानातुन 125 किलो कचरा एकत्र केला आहे. दोडामार्ग तालुक्यातील 92 शाळांनी सहभाग घेत 1 हजार 466 जनांच्या श्रमदानातुन 142 किलो कचरा एकत्र केला आहे.
आरोग्यकेंद्र, उपकेंद्र व परिसर स्वच्छता कार्यक्रमांत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 245 आरोग्यकेंद्र, उपकेंद्र यांनी सहभाग घेत 1 हजार 852 जनांनी श्रमदान करुन 804.65 किलो कचरा एकत्र केला आहे. यामध्ये देवगड तालुक्यातील 45 आरोग्यकेंद्र, उपकेंद्र यांनी सहभाग घेत 343 जनांच्या श्रमदानातुन 174 किलो कचरा एकत्र केला आहे. कणकवली तालुक्यातील 45 आरोग्यकेंद्र, उपकेंद्र यांनी सहभाग घेत 314 जनांच्या श्रमदानातुन 18 किलो कचरा एकत्र केला आहे. वैभववाडी तालुक्यातील 16 आरोग्यकेंद्र, उपकेंद्र यांनी सहभाग घेत 104 जनांच्या श्रमदानातुन 66 किलो कचरा एकत्र केला आहे. मालवण तालुक्यातील 39 आरोग्यकेंद्र, उपकेंद्र यांनी सहभाग घेत 254 जनांच्या श्रमदानातुन 72 किलो कचरा एकत्र केला आहे. कुडाळ तालुक्यातील 32 आरोग्यकेंद्र, उपकेंद्र यांनी सहभाग घेत 238 जनांच्या श्रमदानातुन 55 किलो कचरा एकत्र केला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील 27 आरोग्यकेंद्र, उपकेंद्र यांनी सहभाग घेत 304 जनांच्या श्रमदानातुन 217.50 किलो कचरा एकत्र केला आहे. सावंतवाडी तालुक्यातील 22 आरोग्यकेंद्र, उपकेंद्र यांनी सहभाग घेत 184 जनांच्या श्रमदानातुन 123 किलो कचरा एकत्र केला आहे. दोडामार्ग तालुक्यातील 19 आरोग्यकेंद्र, उपकेंद्र यांनी सहभाग घेत 111 जनांच्या श्रमदानातुन 78 किलो कचरा एकत्र केला आहे.
ग्रामपंचायत व परिसर स्वच्छता कार्यक्रमांत प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 396 ग्रामपंचायत यांनी सहभाग घेत 3505 जनांनी श्रमदान करुन 1231 किलो कचरा एकत्र केला आहे. यामध्ये देवगड तालुक्यातील 52 ग्रामपंचायत यांनी सहभाग घेत 812 जनांच्या श्रमदानातुन 217.5 किलो कचरा एकत्र केला आहे. कणकवली तालुक्यातील 63 ग्रामपंचायत यांनी सहभाग घेत 474 जनांच्या श्रमदानातुन 102.5 किलो कचरा एकत्र केला आहे. वैभववाडी तालुक्यातील 35 ग्रामपंचायत यांनी सहभाग घेत 318 जनांच्या श्रमदानातुन 66 किलो कचरा एकत्र केला आहे. मालवण तालुक्यातील 65 ग्रामपंचायत यांनी सहभाग घेत 435 जनांच्या श्रमदानातुन 185.5 किलो कचरा एकत्र केला आहे. कुडाळ तालुक्यातील 52 ग्रामपंचायत यांनी सहभाग घेत 491 जनांच्या श्रमदानातुन 142 किलो कचरा एकत्र केला आहे. वेंगुर्ला तालुक्यातील 30 ग्रामपंचायत यांनी सहभाग घेत 402 जनांच्या श्रमदानातुन 335 किलो कचरा एकत्र केला आहे. सावंतवाडी तालुक्यातील 63 ग्रामपंचायत यांनी सहभाग घेत 389 जनांच्या श्रमदानातुन 47 किलो कचरा एकत्र केला आहे. दोडामार्ग तालुक्यातील 36 ग्रामपंचायत यांनी सहभाग घेत 184 जनांच्या श्रमदानातुन 135 किलो कचरा एकत्र केला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खेबुडकर यांनी दिली आहे.
००००००
Comments
Post a Comment