“मुख्‍यमंत्री रोजगार निर्मिती योजना गतिमानता पंधरवडा” चे आयोजन

सिंधुदुर्गनगरी दिनांक 02 (जिमाका) :- उद्योगमंत्री तसेच विकास आयुक्‍त (उद्योग), उद्योग संचालनालय, मुंबई यांच्या आदेशानुसार दिनांक 3 ते 17 डिसेंबर 2025 या कालावधीत “मुख्‍यमंत्री रोजगार निर्मिती योजना गतिमानता पंधरवडा” जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी दिली आहे. या पंधरा दिवसांमध्‍ये जिल्‍हा उद्योग केंद्रामार्फत जिल्ह्यामध्ये मुख्‍यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची जनजागृती मोहिम हाती घेण्‍यात येणार आहे. मुख्‍यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे जास्‍तीत जास्‍त प्रस्‍ताव या माध्‍यमातून गोळा करणे. ऑनलाईन अर्जप्रणालीद्वारे पोर्टलवर भरणे, माहिती देणे, प्रचार करणे ई. करण्‍यात येणार आहे. या मोहिमेत मुख्‍यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे अर्ज हे निःशुल्‍क भरुन दिले जातील. जिल्ह्याच्या प्रत्‍येक तालुक्‍यात बॅनर व ऑडियोच्‍या माध्‍यमातून मुख्‍यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची प्रचार व प्रसिध्‍दी करण्‍यात येणार आहे. या योजनेतून जास्‍तीत जास्‍त लाभार्थ्‍यांचे अर्ज प्रस्‍ताव त्‍यांच्‍या कागदपत्रांसहित स्‍वीकारुन त्‍यांची तात्‍काळ छाननी होणार असून बॅंकेकडे अशी प्रकरणे लवकरात लवकर आणि प्राधान्‍याने मंजूर करुन घेण्‍याचा प्रयत्‍न जिल्‍हा उद्योग केंद्र, करणार आहे. यामध्‍ये बॅंकेकडून उपयागिता प्रमाणपत्रे जमा करणे, बॅंकेत रखडलेली मुख्‍यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची प्रकरणे मार्गी लावणे हा मुख्‍य हेतू आहे. या पंधरवड्यामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, तंत्रनिकेतन महाविद्यालय, पंचायत समिती, ग्रामपंचायत, जिल्‍हा परिषद येथे प्रचार व प्रसार करण्‍यात येणार आहे. संबंधित अधिकारी, उद्योग निरिक्षक हे त्‍या वाहनासोबत हजर राहून उपस्थितांना मार्गदर्शन करतील, त्‍यांचे अर्ज जागेवरच निःशुल्‍क भरुन घेतील. तसेच त्‍यांच्‍या शंका व अडचणींचे निराकरण करतील. तरी, लाभार्थ्‍यांनी या जनजागृती मोहिमेचा जास्‍तीत जास्‍त लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हा उद्योग केंद्र महाव्‍यवस्‍थापक यांच्‍याकडून करण्‍यात आले आहे. गतिमानता पंधरवड्यात गावनिहाय आणि तालुकानिहाय मेळावे खालीलप्रमाणे आयोजित केले आहेत. अ.क्र. मेळावा ठिकाणे दिनांक वेळ १ सावंतवाडी ०३ डिसेंबर २०२५ दु. १२.०० २ खारेपाटण ०४ डिसेंबर २०२५ स. ११.०० ३ वैभववाडी ०५ डिसेंबर २०२५ दु. १२.०० ४ कणकवली ०६ डिसेंबर २०२५ स. ११.०० ५ पावशी, ता. कुडाळ ०८ डिसेंबर २०२५ स. ११.०० ६ पोईप, ता. मालवण ०९ डिसेंबर २०२५ स. ११.०० ७ नांदगांव, ता. कणकवली १० डिसेंबर २०२५ स. ११.०० ८ ओसरगांव, ता. कणकवली १० डिसेंबर २०२५ दु. ०३.०० ९ कुडाळ ११ डिसेंबर २०२५ स. १०.३० १० देवगड १२ डिसेंबर २०२५ स. १०.३० ११ वेंगुर्ला १२ डिसेंबर २०२५ दु. ०३.०० १२ मालवण १३ डिसेंबर २०२५ स. १०.३० १३ फोंडाघाट, ता. कणकवली १५ डिसेंबर २०२५ स. ११.०० १४ सांगवे, ता. कणकवली १५ डिसेंबर २०२५ दु. ०३.०० १५ सावंतवाडी १६ डिसेंबर २०२५ स. ०९.०० १६ दोडामार्ग १६ डिसेंबर २०२५ स.. ११.०० १७ कळणे, ता. दोडामार्ग १६ डिसेंबर २०२५ दु. ०३.०० १८ कणकवली १७ डिसेंबर २०२५ स. ०९.०० १९ वैभववाडी १७ डिसेंबर २०२५ स.. ११.०० २० कणकवली १७ डिसेंबर २०२५ दु. ०३.०० २१ वैभववाडी १८ डिसेंबर २०२५ स. ०९.०० २२ वेंगुर्ला १९ डिसेंबर २०२५ स. ०९.०० २३ वालावल, ता. कुडाळ १९ डिसेंबर २०२५ स. ११.०० २४ झाराप, ता. कुडाळ १९ डिसेंबर २०२५ दु. ०३.०० 000000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'