जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) : राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान संधी, समान हक्क असे मूलभूतअधिकार दिलेले आहेत. समस्यग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, तसेच त्या तक्रारी /अडचणीचे निराकरण करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. माहे-नोव्हेंबर 2022 मधील जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवार दि. 21/11/2022 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. समस्यग्रस्त व पिडीत महिलांनी आपले प्रश्न मांडून त्यांचे हक्काचे संरक्षण व्हावे व त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने महिलांच्या तक्रारी व अडचणी याची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक होण्यासाठी महिला लोकशाही दिन हा उत्तम मार्ग आहे. समस्यग्रस्त व पिडीत महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, दालन क्र. 106, ए-ब्लॉक, तळमजला, सिंधुदुर्गनगरी येथे उपलब्ध करुन घ्यावेत. अर्ज स्विकृतीचे निकष : अर्ज विहित नमुन्यात असावा, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, तक्रार अर्ज दोन प्रतीत सादर करावा. अर्ज न स्विकृतीचे निकष : न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसलेले अर्ज. समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. 00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'