राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त आचार्य बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन
सिंधुदुर्गनगरी, दि. 16 (जि.मा.का.) : प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची स्थापना 16 नोव्हेंबर 1966 रोजी झाली. तेव्हापासून 16 नोव्हेंबर हा राष्ट्रीय पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त वृत्तपत्र सृष्टीचे आद्यजनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्यालय पत्रकार समितीचे अध्यक्ष संजय वालावलकर, जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहायक रणजित पवार,बाळ खडपकर, संदीप गावडे, दत्तप्रसाद वालावलकर,विनोद दळवी, गिरीष परब, नंदकुमार आयरे, विनोद परब, देवयानी वरसकर आदी उपस्थित होते.
• सोबत फोटो जोडला आहे.
00000



Comments
Post a Comment