महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ष 2023 मधील स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

सिंधुदुर्गनगरी, दि. 11 (जि.मा.का.)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सन 2023 या वर्षाचे विविध स्पर्धा परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगामार्फत जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती सह सचिव जाहिरात, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी दिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने विविध स्पर्धांत्मक परिक्षा दरवर्षी घेतल्या जातात. या परिक्षांचे नियोजन करताना, संघ लोकसेवा आयोग, विविध विद्यापीठ, परिक्षा घेणा-या इतर संस्था आदींकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परिक्षांचे वेळापत्रक विचारात घेऊन, आयोगाने त्या परिक्षांचे अंदाजित वेळापत्रक निश्चित केले आहे. राज्यातील खेड्यापाड्यातील गरीब व होतकरू उमेदवारांना आयोगामार्फत आयोजित परिक्षांचा लाभ घेता यावा, या दृष्टीने सन 2023 या वर्षाचे वेळापत्रक तयार केले आहे. तरी राज्यातील सर्व होतकरु उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे. * सोबत-वेळापत्रक जोडले आहे.

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'