जलजीवन मिशनच्या माध्यमातून शुध्द व शाश्वत पाणी देण्याकरिता जिल्हा परिषद कठिबध्द -मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर
सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) -जलजीवन मिशनच्या माध्यमातून 55 लिटर शुध्द व शाश्वत पाणी देण्याकरिता जिल्हा परिषद कठिबध्द आहे. शुध्द व स्वच्छ पिण्याचे पाणी देणे हि आपली जबाबदारी असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व 5 हजार 656 पिण्याच्या पाण्याच्या सोर्सची एकाचवेळी जैविक तपासणी करण्यात आली होती. त्याच प्रमाणे जिल्ह्यातील सर्व पिण्याच्या पाण्याच्या सोर्सची रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे असे प्रतिपादन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.
पाणी गुणवत्ता सनियत्रंण व सर्वेक्षण अंतर्गत रासायनिक फिल्ड टेस्ट किटव्दारे सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताचे पाणी नमुने तपासणी प्रशिक्षण कार्यशाळा शिवाजी महाराज सभागृह येथे पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस,पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर आदी मान्यवर अपस्थित होते. यावेळी रासायनिक पाणी नमुने तपासणी किट वितरणाचा शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या सोर्स वर्षातून दोन वेळा रासायनिक तपाणी प्रयोगशाळेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आता प्रयोगशाळे बरोबरच गावागावातील पाणी नमून्याची रासायनिक तपासणी रासायनिक फिल्ड टेस्ट किटच्या माध्यमातून गावातच करण्यात येणार आहे.ग्रामपंचायतीने निवड करण्यात आलेल्या महिलाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखणार आहेत. यासाठी तालुकानिहाय प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरु असून या महिलांना रासायनिक पाणी नमूने तपासणी किटही देण्यात येणार आहे. या किटच्या माध्यमातुन गावातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताची फ्लोराईड, लोह, गडूळपणा (टर्बिडिटी), कॅल्शियम, मॅग्नेशियम, पीच, एकुण क्षारता (अल्कालीनिटी), एकुण कठिणपणा(हार्डनेस), क्लोराईड, नायट्रेट आदी घटकांची तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जनता हि आरोग्य व स्वच्छता विषयक जागृक असल्यानेच सर्वात जास्त पाऊस आपल्या जिल्ह्यात होऊनही जलजन्य आजाराचे प्रमाण अंत्यत कमी आहे. ग्रामपंचायत निहाय प्रशिक्षित करण्यात येणाऱ्या महिलांनी आपल्या गावातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे रासायनिक फिल्ड टेस्ट किटच्या माध्यमातून सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी यावेळी केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी केले तर आभार व सुत्रसंचालन पाणी गुणवत्ता निरिक्षक निलेश मठकर यांनी केले.
0000
Comments
Post a Comment