जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्‍पर्धेच्या तारखा व ठिकाणांमध्ये बदल - अधिकारी विद्या शिरस

सिंधुदुर्गनगरी, दि. 30 (जि.मा.का.) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्‍ट्र राज्‍य पुणे व जिल्‍हा क्रीडा परिषद सिंधुदुर्ग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शालेय क्रीडा स्‍पर्धेचे आयोजन केले जाते. सन 2022-23 या वर्षाच्या जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट, बेसबॉल, कुस्ती,डॉजबॉल, किक बॉक्सींग या सर्व गटाच्या स्पर्धाच्या तारखांमध्ये पुढीलप्रमाणे बदल करण्यात आलेले असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली. जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी बेसबॉल स्पर्धा. जिल्हा क्रीडा संकुल येथे दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी किक बॉक्सींग स्पर्धा. अ.कृ.केळकर हायस्कुल वाडा देवगड येथे दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी डॉजबॉल स्पर्धा. जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे दिनांक 19 ते 21 डिसेंबर 2022 रोजी क्रिकेट स्पर्धा. कुडाळ हास्कुल कुडाळ येथे 2 डिसेंबर 2022 रोजी सॉफ्टबॉल स्पर्धा. जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे दिनांक 5 डिसेंबर 2022 रोजी 14, 17 आणि 19 वर्षाखालील मुले व मुली यांची कुस्ती फ्री स्टाईल स्पर्धा. जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी 17 आणि 19 वर्षाखालील मुले व मुली यांची कुस्ती फ्री स्टाईल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांनी यांची नोंद घ्यावी व आपल्या खेळाडूंना स्पर्धाच्या ठिकाणी उपस्थिती द्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'