शालांत प्रमाणपत्र व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र, खासगी 17 नं. फॉर्म भरुन परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना नावनोंदणीसाठी 25 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ
सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) : फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12 वी तसेच खासगीरित्या फॉर्म नं. 17 भरुन परिक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन नावनोंदणी करण्यासाठी शुक्रवार दि. 25/11/2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परिक्षेला बसावयाचे आहे त्यांनी यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय मंडळाचे विभागीय सचिव भावना राजनीर यांनी केले आहे.
000
Comments
Post a Comment