राज्यस्तरीय युवा संसदसाठी संरक्षण मंत्री पदासाठी यशोधन देवधर यांची तर संसद सदस्यपदी सिध्दी गोसावी

सिंधुदुर्गनगरी, दि. २3 (जि.मा.का.) : युनिसेफ आणि नेहरु युवा केंद्र यांच्यावतीने 14 ते 15 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे राज्यस्तरीय युवा संसदेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यस्तरीय युवा संसदेला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील एकूण 72 युवकांची निवड करण्यात आली. युवा संसदेसाठी मंत्रीपदाच्या उमेदवारीसाठी जिल्ह्यातून संरक्षण मंत्री पदासाठी यशोधन प्रसाद देवधर यांची तर संसद सदस्यपदी सिध्दी गोसावी यांची निवड करण्यात आली. नव्याने सादर केलेल्या अग्निपथ योजनेसह गुप्तचर यंत्रणातटीय सुरक्षा यासारख्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित चर्चा करण्यात आली. पहिल्या दिवशी मुंबई येथील विधानभवन, राजभवन यांची भेट घेतली. तेथील कामकाज केसे चालते याबद्दल युवकांना माहिती देण्यात आली. दुसऱ्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबई विद्यापिठात कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर युवा संसदेला सुरुवात झाली सर्व मंत्री मंडळ आणि सदस्यांना सामुहिक शपथ घेतली. देशातील विविध प्रश्न विरोधी पक्षाच्यावतीने सभागृहात मांडण्यात आले. त्याला मंत्रिमंडळाने अपेक्षित अशी उत्तरे हि दिली. यावेळी मंत्री मंडळात 3 विधयके मांडण्यात आली आणि 3 विधेयके मंजूर केली गेली. युवा संसद युवकांना भविष्यात राजकीय क्षेत्रात जाण्यासाठी अतिशय महत्वपूर्ण ठरेल. या कार्यक्रमाच्या शेवटच्यादिवशी संध्याकाळी स्थानिक कलाकारांचा लोकनृत्याचा कार्यक्रम आयोजित केला यात राज्यातील संस्कृती दर्शवणारी लोकनृत्ये सादर करण्यात आली. या राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रम नेहरु युवा केंद्राचे राज्य निदेशक प्रकाश कुमार मनुरे आणि युनिसेफचे तानाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'