सरपंच पदासाठी १०३ तर सदस्य पदासाठी ३९७ नामनिर्देशन पत्र दाखल आजअखेर एकूण सरपंचसाठी १४२ तर सदस्यसाठी ५०० नामनिर्देशन पत्र दाखल

सिंधुदुर्गनगरी, दि.30 (जि.मा.का.) : जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आजच्या दिवशी सरपंच पदासाठी १०३ तर सदस्य पदासाठी ३९७ नामनिर्देशन पत्र दाखल झाली. आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १४२ तर सदस्यपदासाठी ५०० नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील सामान्य शाखेकडून देण्यात आली. तालुका निहाय दाखल झालेले नामनिर्देशन पत्र आणि एकूण दाखल झालेले नामनिर्देशन पत्र पुढीलप्रमाणे: कणकवली- ग्रामपंचायत संख्या ५८, सरपंच पदासाठी २१, सदस्य पदासाठी १०७,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ३१,सदस्य पदासाठी १२९. वैभववाडी - ग्रामपंचायत संख्या १७, सरपंच पदासाठी ४, सदस्य पदासाठी १४,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ५, सदस्य पदासाठी १६. देवगड - ग्रामपंचायत संख्या ३८, सरपंच पदासाठी १३, सदस्य पदासाठी ४०, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १९, सदस्य पदासाठी ६१. मालवण - ग्रामपंचायत संख्या ५५, सरपंच पदासाठी ३, सदस्य पदासाठी १४,आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ६, सदस्य पदासाठी २१. कुडाळ - ग्रामपंचायत संख्या ५४, सरपंच पदासाठी २७, सदस्य पदासाठी ८०, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी ३२, सदस्य पदासाठी ९१. सावंतवाडी- ग्रामपंचायत संख्या ५२, सरपंचपदासाठी १६, सदस्य पदासाठी ७०,आज अखेर सरपंचपदासाठी एकूण १६, सदस्य पदासाठी ७१ . वेंगुर्ला- ग्रामपंचायत संख्या २३, सरपंच पदासाठी ९, सदस्य पदासाठी ३६, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १५, सदस्य पदासाठी ५७. दोडामार्ग - ग्रामपंचायत संख्या २८, सरपंच पदासाठी १०, सदस्य पदासाठी ३६, आज अखेर एकूण सरपंचपदासाठी १८, सदस्य पदासाठी ५४. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'