जात वैधता प्रमाणपत्रासाठी 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करावेत

सिंधुदुर्गनगरी, दि. 15 (जि.मा.का.) : सन 2022-23 या चालू शैक्षणिक वर्षासाठी इ.11 वी व इ.12 वी, विज्ञान या इयत्तेमध्ये शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य प्रमोद जाधव यांनी केले आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती,इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे, उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येते. 12 वी विज्ञान उत्तीर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी वैद्यकिय, अभियांत्रिकी, आर्कीटेक्चर, फार्मसी, कृषी, L.L.B, B.F.A, हॉटेल व्यवस्थापन अशा शाखेच्या उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. यासाठी त्यांना सी.ई.टी, निट, जे.ई.ई, नाटा अशा प्रवेश परिक्षा द्याव्या लागतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी www.barti.maharashtra.gov.in किंवा bartievalidaty.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर CCVIS येथे ऑनलाईन अर्ज भरावेत. स्वत:,पालक,महाविद्यालय प्रतिनीधी समान संधी केंद्र यांच्या मार्फत अर्जाची पाटपोठ प्रिंट, मुळ कागदपत्रे व त्यांची साक्षकिंत प्रत लवकरात लवकर समिती कार्यालयात सादर करावी. असे आवाहन अध्यक्ष डॉ. भरत बास्टेवाड, उपायुक्त तथा सदस्य प्रमोद जाधव, सचिन साळे, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सिंधुदुर्गव्दारे करण्यात येत आहे. या प्रवेश प्रकियेसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवेशापूर्वी त्यांच्या जात पडताळणी अर्जावर निर्णय घेऊन जात वैधता प्रमाणपत्र देणे ही प्रक्रीया करण्यासाठी समितीला निर्णय घेण्यासाठी लागणारा कालावधी 5 महिन्याचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासन निर्णय दि. 25 जानेवारी 2000 अन्वये प्रत्येक वर्षी 30 नोव्हेंबर पर्यंत समितीकडे अर्ज सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. 0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'