रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे श्रध्दांजली
सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जिमाका)- येथील उपप्रादेशिक कार्यालयाच्यावतीने रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. त्याबरोबर रस्ता सुरक्षा शपथही घेण्यात आली.
रस्ते अपघातात बळी गेलेल्यांच्या स्मरणार्थ आम्ही सर्व वाहनचालक अशी शपथ घेतो की, रस्ता अपघातात कोणीही बळी पडू नये. यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहू. तसेच सर्व वाहतूक नियमांचे पालन करुन रस्ता सुरक्षा आमचे ध्येय आणि उद्दिष्ट आहे. रस्त्यावर अपघात झाल्यास अपघात ग्रस्तांना मदत करणे हे आमचे प्रथम कर्त्यव्य राहील. रस्ता सुरक्षा नियमांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही पुर्णपणे कटिबध्द आहोत अशी शपथ यावेळी घेण्यात आली. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे यांच्यासह कुडाळ एस.टी. डेपो येथील अधिकारी कर्मचारी, ट्रक चालक- मालक संघटनेचे पदाधिकारी तसेच प्रवासी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
सोबत :- फोटो जोडला आहे.
00000
Comments
Post a Comment