ऑगस्ट महिन्यातील लोकशाही दिन व जिल्हा समन्वय समितीची सभा रद्द / टपाला विभागाची रक्षाबंधन सणानिमित्त विशेष स्पीड पोस्ट वितरण व्यवस्था करणार

ऑगस्ट महिन्यातील लोकशाही दिन व
जिल्हा समन्वय समितीची सभा रद्द
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 30 : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सभा, बैठकांचे आयोजन करण्यात येऊ नये, असे निर्देश असल्याकारणाने माहे ऑगस्ट 2020 मधील लोकशाही दिन व जिल्हा समन्वय समितीची सभा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी यांनी दिली.
0000

टपाला विभागाची रक्षाबंधन सणानिमित्त
विशेष स्पीड पोस्ट वितरण व्यवस्था करणार
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का) दि. 30 : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या राज्यात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात जनतेला कुठेच बाहेर जाता येत नाही. या पार्श्वभुमीवर टपाल विभागाने रक्षाबंधन सणासाठी विशेष स्पीड पोस्ट वितरण व्यवस्था राबविण्याचे ठरविले आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग विभागचे अधीक्षक डाकघर यांनी दिली.
          सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणानिमित्त भाऊ बहिणीला बाहेर जाता येत नसल्यामुळे पोस्टाची विशेष स्पीड पोस्ट वितरण व्यवस्था राबविण्यात येणार आहे. त्यासाठी रविवार दि. 2 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व टपाल विभाग रक्षाबंधन वितरणासाठी विशेष व्यवस्था राबवित आहे. तरी याचा लाभ सर्व महिला  भगीनींनी  घ्यावा, असे आवाहन टपाल विभागामार्फत करण्यात आले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'