जिल्ह्यातील सध्याचे लॉकडाऊन फक्त 8 जुलै 2020 रोजी रात्री 12 पर्यंतच - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

जिल्ह्यातील सध्याचे लॉकडाऊन फक्त
8 जुलै 2020 रोजी रात्री 12 पर्यंतच
-         जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का.) दि. 03 – जिल्ह्यात सध्या जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनला कोणत्याही प्रकारची मुदतवाढ नसून हे लॉकडाऊन 8 जुलै 2020 रोजी रात्री 12 वाजेपर्यंतच आसल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिली.
            या लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारच्या वैद्यकीय अस्थापना या पूर्ण वेळ सुरू राहणार आहेत. त्यामध्ये औषध दुकानांचाही समावेश आहे. तसेच जिल्ह्यतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने जिल्हा वसियांच्या भल्यासाठीच सदर लॉकडाऊन केला आहे. या काळात नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे योग्य ते पालन करून सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर 3.2 मीटर उंच लाटांचा इशारा मच्छिमारांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'