कणकवली तालुक्यात 133 मि.मी पावसाची नोंद जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार / तिलारी आंतरराज्य प्रकल्पात 77.24 टक्के पाणीसाठा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 164.40 मि.मी. पावसाची नोंद
कणकवली तालुक्यात 133 मि.मी पावसाची नोंद
जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार
सिंधुदुर्गनगरी ( जि.मा.का) दि. 08 – गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 133 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात सरासरी 94.075 मि.मी पाऊस झाला असून आतापर्यंत एकूण 1694.900 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 95 (1601), सावंतवाडी – 87 (1782), वेंगुर्ला – 69.60 (1742.20), कुडाळ – 120 (1573), मालवण – 104 (2178), कणकवली – 133 (1615), देवगड – 85 (1521), वैभववाडी – 59 (1547) असा पाऊस झाला आहे.
00000
तिलारी आंतरराज्य प्रकल्पात 77.24 टक्के पाणीसाठा
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 164.40 मि.मी. पावसाची नोंद
सिंधुदुर्गनगरी (जि.मा.का.) दि. 08 – तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये एकूण 345.5290 द.ल.घ.मी पाणीसाठा झाला आहे. सध्या हे धरण 77.24 टक्के भरले आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 164.40 मि.मी पावसाची नोंद झाली असून यंदाच्या मोसमात एकूण 1704.80 मि.मी पाऊस झाला आहे.
कणकवली तालुक्यातील देवघर मध्यम प्रकल्पामध्ये 52.6740 द.ल.घ.मी. म्हणजेच 53.74 टक्के पाणीसाठा आहे. वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पामध्ये 33.6400 द.ल.घ.मी म्हणजेच 47.84 इतका पाणीसाठा आहे. देवगड तालुक्यातील कोर्ले – सातांडी प्रकल्प 100 टक्के भरला आहे.
लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढील प्रमाणे आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी मध्ये असून कंसात उपलब्ध साठ्याची टक्केवारी दिली आहे. शिवडाव – 2.6480 (100), नाधवडे – 3.2819 (75.14), ओटाव – 2.8696 (61.32), देंदोनवाडी – 1.2152(12.40), तरंदळे – 0.6540 (14.35), आडेली – 1.2880(100), आंबोली – 1.7250 (100), चोरगेवाडी – 1.8920 (59.13), हातेरी – 1.9630 (100), माडखोल – 1.6900 (100), निळेली – 1.7470 (100), ओरोस बु. – 1.1060 (45.97), सनमटेंब – 2.3900 (100), तळेवाडी – डिगस – 0.8920 (35.62), दाभाचीवाडी – 1.7680 (73.03), पावशी – 3.0300 (100), शिरवल – 3.6800 (100), पुळास – 1.5080 (100), वाफोली – 1.3380 (57.42), कारिवडे – 0.8310 (60.00), धामापूर – 1.9910 (81.56), हरकुळ – 2.3800 (100), ओसरगाव – 0.8080 (60.34), ओझरम – 1.8190 (100), पोईप – 0.7760 (66.72), शिरगाव – 0.3760 (23.77), तिथवली – 0.9370 (54.38), लोरे – 2.6960 (100).
00000
Comments
Post a Comment